कंधार : इंग्रजी वषार्ची सुरुवात जानेवारी महिन्याने होते. नवीन वषार्तील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. मकरसंक्रात हा सण महिलांसाठी मेजवानीच असते. सुवासिनी महिला वस्तूंच्या रुपात वाण देवून हा सण साजरा करतात. कंधार शहरातील शिवाजी नगर येथे राहणा-्या सुरेखा राठोडकर या शिक्षिकेने पर्यावरणाचे संतुलन साधता यावे यासाठी वस्तू रुपी वाणाला बगल देत वृक्षरोपाचे वाण देत एक आदर्श निर्माण केला आहे.
मकरसंक्रांत म्हणजे महिला वगार्चा आवडता सण होय. हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्त्व आहे. सूर्य देव जेव्हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतात, त्या दिवसाला मकर संक्रांती किंवा उत्तरायण म्हटले जाते. देशातील अनेक भागात मकर संक्रांतीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. हा सण खास करुन महिलांचा असतो. कारण या दिवशी सुगड पुजण्यापासून ते मकर संक्रांत सुरु झाल्यानंतर १५ दिवस हळदीकुंकवाचा कार्यक्रम सुरु होतो.
या काळात अनेक महिला आपल्या आपल्या मित्र महिलांना बोलावून हळदीकुंकूवाचा कार्यक्रम आयोजित करतात. वषार्नुवर्षे वाण देणा-्या महिलांना दरवर्षी यंदा वाण काय द्यावे? असा प्रश्न पडत असतो. शिवाजी नगर येथील रहिवाशी असलेल्या सुरेखा राठोडकर यांनी यावर्षीच्या मकरसंक्रांतीला परस बागेत निर्माण केलेली फुल वर्गीय आणि शोभेच्या वृक्षांची रोपटी वाण म्हणून देताना एक पर्यावरण पूरक उपक्रम राबवून एक आदर्श निर्माण केला आहे.