28.2 C
Latur
Sunday, March 7, 2021
Home नांदेड नांदेड जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या घटली

नांदेड जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या घटली

एकमत ऑनलाईन

नांदेड : गेल्या आठवडाभरापासून कोराना बाधित रुग्णसंख्येचा वेग मंदावला आहे. गुरूवारी उपचार घेत असलेल्या ५२ कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर ४९ कोरोना बाधितांची भर पडली आहे. दरम्यान एकही मृत्यु झाला नसल्याची नोंद झाली आहे.

आजच्या १ हजार ५४ अहवालापैकी १ हजार १0 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता २0 हजार ५१६ एवढी झाली असून यातील १९ हजार ४३६ बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण ३३६ बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील १५ बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविड-१९ मुळे जिल्ह्यातील ५५0 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत. आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी ५, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण १२, हदगाव कोविड रुग्णालय ४, खाजगी रुग्णालय १0, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड ४, मुखेड कोविड रुग्णालय ५, बिलोली तालुक्यांतर्गत २ असे एकूण ४२ बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण ९४.७३ टक्के आहे.

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात ५, मुखेड तालुक्यात १0, भोकर १, नायगाव १ असे एकुण १७ बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र ५, मुखेड तालुक्यात ३, हदगाव १ असे एकुण ९ बाधित आढळले.जिल्ह्यात ३३६ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे १९, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे ३६, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे ३३, मुखेड कोविड रुग्णालय २६, किनवट कोविड रुग्णालय २, हदगाव कोविड रुग्णालय ३, देगलूर कोविड रुग्णालय 4, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण ७५, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण ११६, खाजगी रुग्णालय २२ आहेत. शुक्रवार ४ डिसेंबर रोजी ५ वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 184, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे ७२ एवढी आहे. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे अ‍ॅप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

लसीचा दिलासा अन् संशयकल्लोळही!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,442FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या