34.4 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeनांदेडनांदेड जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा चोविस हजाराच्या दारात

नांदेड जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा चोविस हजाराच्या दारात

एकमत ऑनलाईन

नांदेड : कोरोनाच्या नविन रूग्णांचा आलेख वाढतच आहे. जिल्हयात गुरुवारी सायं. ५ वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार ७० व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. दररोज वाढणा-या या आकडेवारीने नांदेडकरांची चिंताही वाढत आहे.या वाढत्या रूग्ण संख्येमुळे नांदेड जिल्हयाचा एकुण आकडा चोविस हजाराच्या दारात जावून पोहचला आहे.

कोरोनाची वाढती रूग्ण संख्या आता प्रशासनासह नांदेडकरांची चिंता वाढवित आहेग़्रामीण भागा पेक्षा महापालिका क्षेत्रात रूग्ण वाढत असल्याचे दिसून येत आहेग़ुरुवारी सायं. ५ वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार ७० व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे ४८ तर अ‍ॅटिजेन किट्स तपासणीद्वारे २२ बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या ४० कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजच्या १ हजार ३०२ अहवालापैकी १ हजार २२५ अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता २३ हजार ४०९ एवढी झाली असून यातील २२ हजार १३१ बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.

एकुण ४७० बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील १४ बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविड-१९ मुळे जिल्ह्यातील ५९५ व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत. आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी ५, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण ११, खाजगी रुग्णालय ८, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड १२, गोकुंदा कोविड रुग्णालय ४ असे एकूण ४० बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण ९४.५४ टक्के आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र ३६,ं हदगाव तालुक्यात ३, नायगाव तालुक्यात १, यवतमाळ ३, निजामबाद १, नांदेड ग्रामीण १, लोहा तालुक्यात १, लातूर १, वाशिम १, असे एकुण ४८ बाधित आढळले.

अ‍ॅटीजन किट्स तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र १४, किनवट तालुक्यात ३, देगलूर तालुक्यात २, अधार्पूर तालुक्यात ३ असे एकूण २२ बाधित आढळले. जिल्ह्यात ४७० बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे २२, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड ४७, किनवट कोविड रुग्णालयात १९, हदगाव कोविड रुग्णालय ३, देगलूर कोविड रुग्णालय ६, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण २६८, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण ६४, खाजगी रुग्णालय ४१ आहेत. रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती ४७० असून यात १४ जणांची अतिगंभीर प्रकृती बनली आहे. गुरुवार २५ फेब्रुवारी रोजी ५ वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे १६१, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे ५७ एवढी आहे.

 

रोबोचा कायदेशीर दर्जा कोणता..?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या