34.4 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeनांदेडनांदेड जिल्ह्यात कोरोनाचा आकडा वाढला ; ८० पॉझिटिव्ह

नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा आकडा वाढला ; ८० पॉझिटिव्ह

एकमत ऑनलाईन

नांदेड : कोरोना अहवालानुसार ८० व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वार ५१ तर अ‍ॅटिजेन किट्स तपासणीद्वारे २९ बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या ४८ कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजच्या १ हजार ७०८अहवालापैकी १ हजार ६१४ अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता २३ हजार ५६४ एवढी झाली असून यातील २२हजार २२५ बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण ५२७बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील १७बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

शुक्रवार२६ फेब्रुवारी रोजी हदगाव तालुक्यातील कोळी येथील ७५ वर्षाच्या एका महिलेचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर आजपर्यंत कोविड-१९मुळे जिल्ह्यातील ५९८व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी १, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण २८, गोकुंदा कोविड रुग्णालय ११, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल १ खाजगी रुग्णालय ७असे एकूण ४८ााधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.

आठरा लाख अपहरण प्रकरणी ग्रामसेवकावर गुन्हा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या