23.2 C
Latur
Wednesday, June 16, 2021
Homeनांदेडनांदेड जिल्ह्याचा कोरोनाच्या रूग्ण संख्येचा आलेख घटला

नांदेड जिल्ह्याचा कोरोनाच्या रूग्ण संख्येचा आलेख घटला

एकमत ऑनलाईन

नांदेड : गेल्या पंधरा दिवसात पहिल्यांच कोरोनाच्या रूग्ण संख्येचा आलेख एकदम खाली घसरला आहे.जिल्ह्यात रविवारी प्राप्त झालेल्या १ हजार ८५० अहवालापैकी ३३७ अहवाल कोरोना बाधित आले आहेत.यामुळे नांदेडवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे.मात्र धोका अजूनही कायम आहे. कोरोनाच्या रूग्ण संख्येत गेल्या पंधरा दिवसापासून सातत्याने घट होत आहे.यात पहिल्यांदा नव्या रूग्णांचा आलेख एकमद घटना आहे.रविवारी प्राप्त झालेल्या अहवालात केवळ ३३७ नवे बाधित रूग्ण आढळून आले आहेत.यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे २४८ तर अँटिजेन तपासणीद्वारे ८९ अहवाल बाधित आहेत.

जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या ८४ हजार ९६१ एवढी झाली असून यातील ७७ हजार ६५९ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला ५ हजार २८५ रुग्ण उपचार घेत असून १७७ बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. दिनांक ७ ते ९ मे २०२१ या तीन दिवसांच्या कालावधीत १९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या १ हजार ७१५ एवढी झाली आहे.

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा ११४, देगलूर ८, कंधार १, मुदखेड १५, परभणी ४, नांदेड ग्रामीण १७, धमार्बाद १, किनवट ७, मुखेड ४, यवतमाळ ३, अर्धापुर ८, हदगाव २१, लोहा १२, उमरी ९, सोलापूर १, बिलोली १६, हिमायतनगर १, माहूर २, हिंगोली ३, तेलंगणा १ व्यक्ती बाधित आढळले तर अ‍ॅन्टिजेन तपासणीमध्ये नांदेड मनपा क्षेत्रात ९, देगलूर २, किनवट ४, नायगाव ३, नांदेड ग्रामीण १, धर्माबाद ५, लाहा १, यवतमाळ २, अर्धापुर १३, हिमायतनगर १२, माहूर २, लातूर १, बिलोली ४, कंधार २३, मुदखेड ३, हिंगोली ४ असे एकूण ३३७ बाधित आढळले.

आज जिल्ह्यातील ७१५ कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे १०, मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण ४१४, धमार्बाद तालुक्यातंर्गत ५, देगलूर कोविड रुग्णालय २, अर्धापुर तालुक्यातंर्गत ४, उमरी तालुक्यातंर्गत ३, खाजगी रुणालय १५०, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल १५, मुखेड कोविड रुग्णालय २५, मुदखेड कोविड केअर सेंटर १६, किनवट कोविड रुग्णालय १, नायगाव कोविड केअर सेंटर २, बिलोली तालुक्यातंर्गत २९, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय ४, बारड कोविड केअर सेंटर ७, माहूर तालुक्यांतर्गत ८, हदगाव तालुक्यातर्गत ६, लोहा तालुक्यांतर्गत १२, मालेगाव टिसीयू कोविड रुग्णालय २ व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

आज ५ हजार २८५ कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचारानंतर सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय १४५, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल ७३, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल (नवी इमारत) १०१, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय ३७, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर ७९, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर १५९, देगलूर कोविड रुग्णालय २२, जैनब हॉस्पिटल व कोविड केअर देगलूर १९, बिलोली कोविड केअर सेंटर ९९, हिमायतनगर कोविड केअर सेंटर १२, नायगाव कोविड केअर सेंटर ८, उमरी कोविड केअर सेंटर २१, माहूर कोविड केअर सेंटर १४, भोकर कोविड केअर सेंटर ८, हदगाव कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर ३२, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर ३१, कंधार कोविड केअर सेंटर ११, धमार्बाद कोविड केअर सेंटर ४१, मुदखेड कोविड केअर सेंटर १७, अर्धापुर कोविड केअर सेंटर १६, बारड कोविड केअर सेंटर २९, मांडवी कोविड केअर सेंटर ५, मालेगाव टिसीयु कोविड रुग्णालय १०, भक्ती जंम्बो कोविड केअर सेंटर १६, एनआरआय कोविड केअर सेंटर ४९, नांदेड मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण १ हजार ३२३, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृहविलगीकरण १ हजार ८००, खाजगी रुग्णालय १ हजार ११९ व्यक्ती उपचार घेत आहेत.

आज रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे २०, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे ६०, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे ५४, भक्ती जम्बो कोविड केअर सेंटर २९ खाटा उपलब्ध आहेत.

उमरगा तालुक्यात केवळ ७.४६ टक्के लसीकरण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या