30.5 C
Latur
Monday, March 1, 2021
Home नांदेड जिल्ह्यात ५९ कोरोनाचे रूग्ण वाढले; एकाचा मृत्यू

जिल्ह्यात ५९ कोरोनाचे रूग्ण वाढले; एकाचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

नांदेड : नांदेड कोरोना अहवालानुसार ५९ व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे ३० तर अ‍ॅटिजेन किट्स तपासणीद्वारे २९ बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या २५ कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजच्या ६११ अहवालापैकी ५४६ अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता २३हजार २०८ एवढी झाली असून यातील 22 हजार 29 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण ३७५ बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 11 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. रविवार २१ फेब्रुवारीला देगलूर तालुक्यातील हाणेगाव येथील ४७ वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आजपर्यंत कोविड-१९ मुळे जिल्ह्यातील ५९३व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी २, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण १३, खाजगी रुग्णालय 6, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड ३, माहूर तालुक्यांतर्गत १ असे एकूण २५ बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण ९४.९१टक्के आहे.

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र २१, लोहा तालुक्यात २ परभणी २ नांदेड ग्रामीण १ नायगाव १, हिंगोली ३असे एकुण ३०बाधित आढळले. अँटीजन किट्स तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र २१, किनवट तालुक्यात २, हिंगोली १, हदगाव ४, मुखेड १ असे एकूण २९ बाधित आढळले.
जिल्ह्यात३७३बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे ३१, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड ४४, किनवट कोविड रुग्णालयात १५, हदगाव कोविड रुग्णालय ३, देगलूर कोविड रुग्णालय ५, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 186, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण ४७, खाजगी रुग्णालय४ आहेत.

सोमवार २२फेब्रुवारी रोजी ५ वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे १५३ जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे ६० एवढी आहे. जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती एकुण घेतलेले स्वॅब- २ लाख २३ हजार १६८, एकुण निगेटिव्ह स्वॅब- १ लाख ९५ हजार ५२०, एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- २३ हजार २०८, एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या-२२ हजार २९, एकुण मृत्यू संख्या ५९३, उपचारानंतर बाधित रुग्ण घरी (गृहविलगीकरण) बरे होण्याचे प्रमाण ९४९१ टक्के, आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-१, आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-३, आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-३९५, रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्त३७५, अतिगंभीर प्रकृती असलेले-११ एवढी आहे.

 

लातुरच्या प्रतिक फुटाणे ने केला विक्रम; एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या