31.9 C
Latur
Monday, January 25, 2021
Home नांदेड कोरोना बाधितांची संख्या वाढली; ६१ जणांची भर

कोरोना बाधितांची संख्या वाढली; ६१ जणांची भर

एकमत ऑनलाईन

नांदेड : गेल्या काही दिवसात पुन्हा कोरोनाची संख्या वाढत आहे.मंगळवारी आलेल्या अहवालानुसार ६१ व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत.यात शहर परिसरातील संख्या जास्त असून कोरोनाची वाढती संख्या आता चिंताजनक बनत आहे.

मंगळवारी एकुण १ हजार ९७१ अहवालापैकी १ हजार ८५३ अहवाल निगेटिव्ह आले. तर ६१ व्यक्तिंचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे ३५ तर अ‍ॅटिजेन किट्स तपासणीद्वारे २६ बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या ३३ कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता २० हजार १०३ एवढी झाली असून यातील 18 हजार 980 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 385 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील १६ बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आज रोजी प्राप्त अहवालानुसार एकाही रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला नाही त्यामुळे आजपर्यंत कोविड-१९ मुळे जिल्ह्यातील ५४५ व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड ३, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण १६, देगलूर कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण १, जिल्हा रुग्णालय १३ असे एकूण ३३ बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण ९४.४१ टक्के आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात १५, किनवट ५, हिमायतनगर ३, मुदखेड १, अधार्पूर १, धमार्बाद ४, कंधार ४, मुखेड २ असे एकुण ३५ बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र १७, भोकर १, कंधार २, लोहा १ , नांदेड ग्रामीण १, देगलूर १, नायगांव २, परभणी १ असे एकुण २६ बाधित आढळले.

जिल्ह्यात ३८५ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे २६, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे २५, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे ३९, मुखेड कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण १0, किनवट कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण ५, देगलूर कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण ७, हदगाव कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण ७, भोकर कोविड केअर सेंटर व गृह विलगीकरण ५, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृह विलगीकरण ६६, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण १३३, हैदराबाद येथे संदर्भित १, औरंगाबाद येथे संदर्भित १, खाजगी रुग्णालय ६0 आहेत.

मंगळवार २४ नोव्हेंबर २0२0 रोजी ५ वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे १७५, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे ८१ एवढी आहे.

शिरूर अनंतपाळ नगर पंचायत मधील भ्रष्टाचाराची चौकशी करावी. महाविकास आघाडी तर्फे महामोर्चा काढून कुलूप बंद आंदोलन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,417FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या