25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeनांदेडनांदेड जिल्ह्यातील रूग्णसंख्येत घट कायम

नांदेड जिल्ह्यातील रूग्णसंख्येत घट कायम

एकमत ऑनलाईन

नांदेड : गेल्या काही दिवसापासून कोरोनाच्या रूग्ण संख्येतील घट कायम असल्याने दिलासा दिलासा मिळत आहे.सोमवारी प्राप्त झालेल्या २ हजार ७०८ अहवालापैकी ७०२ अहवाल कोरोना बाधित आले आहेत.तीन दिवसात २५ जणांचा मृत्यु झाला असून १९२० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सोमवारी प्राप्त झालेल्या अहवालात नव्या बाधितातील ७०२ पैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे ६०४ तर अँटिजेन तपासणीद्वारे ९८ अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या ८१ हजार ९८६ एवढी झाली असून यातील ७१ हजार २६५ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला ८८३५ रुग्ण उपचार घेत असून २१४ बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे.

दिनांक १ ते २ मे या दोन दिवसांच्या कालावधीत २५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या १ हजार ६२४ एवढी झाली आहे . उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६.९२ टक्के आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा १९८, बिलोली ७, नांदेड ग्रामीण १६, अर्धापूर ३४ , भोकर १९, देगलूर ३३, धर्माबाद २८, हदगाव ४३, हिमायतनगर १४, कंधार १८, किनवट २९, लोहा १६, माहूर ५, मुदखेड २६, मुखेड ५५, नायगाव ३४, वाशिम १, झारखंड १, हिंगोली १०, लातूर २, परभणी ८ तर अ‍ॅन्टीजेन तपासणी नांदेड मनपा २६, नांदेड ग्रामीण ४, अर्धापूर ८, भोकर २, बिलोली १, देगलूर ५, धर्माबाद १, हदगाव ३, हिमायतनगर २, कंधार २, किनवट १५, लोहा, ४, माहूर २, मुखेड ६, नायगवा ५, हिंगोली ४, उमरी ४, यवतमाळ २, बीड १ व आदीलाबाद येथील एका बाधिताचा समावेश आहे.

यासोबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णूपुरी येथे १६३ नायगाव कोव्हीड सेंटर १९, बारड २५, जिल्हा रूग्णालय ९१, उमरी २८, मांडवी ९, जिल्हा रूग्णालय नविन इमारत १७२, माहूर २४, मालेगाव ४, भक्ती जंबो ४०, एनआरआय कोव्हीड सेंटर ४६, पंजाब भवन १९६, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण ३४१४, जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत २३६०, खाजगी रूग्णालय १७८९, शासकीय आयुर्वेदीक ४७, भोकर ८, हदगाव ४८, लोहा ३७, कंधार १७, धर्माबाद ४३, मुदखेड १३, अर्धापूर २२, किनवट ८१, मुखेड ८१, देगलूर ३५, जेनब कोव्हीड सेंटर १९, बिलोली ८३, हिमायतनगर १, या पध्दतीने बाधित रूग्ण उपचार घेत आहेत.

जिल्हाधिका-यांचे थेट प्रधान सचिवांना साकडे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या