25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeनांदेडनांदेडकरांसाठी एकच पर्याय कडक लॉकडाऊन

नांदेडकरांसाठी एकच पर्याय कडक लॉकडाऊन

एकमत ऑनलाईन

नांदेड : नांदेड जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारलेले ना. अशोकराव चव्हाणांनी वारंवार नागरिकांना आवाहन करुनही शहरातील अनेक वस्त्यांमध्ये अद्यापही वर्दळ आढळून येत आहे. विशेषत: मुस्लीम प्रभागात अनेक नागरिक रस्त्यावर वावरतांना दिसून येत आहेत. व्यापारी मंडळी देखील ‘शटर बंद उद्योग चालु’ या अनुषंगाने व्यवसाय करत आहेत. त्यामुळे शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून मृत्यूच्या संख्येचा आलेख वाढताच राहत आहे. जिल्हा प्रशासन व पालकमंत्री अशोकराव चव्हाण रस्त्यावर उतरुन नागरिकांना आवाहन करीत आहेत परंतु याचा कुठलाच फरक दिसून येत नसल्यामुळे नांदेडकरांसाठी एकच पर्याय ‘कडक लॉकडाऊ न’ आता उरला आहे.

पालकमंत्री अशोकराव चव्हाण, खा. प्रताप पाटील चिखलीकर, आ. अमरनाथ राजूरकर, आ. मोहनराव हंबर्डे, आ. बालाजी कल्याणकर यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी नांदेडकरांना त्रिसुत्री नियमांचा अवलंब करा, मास्क, हात धुणे, सोशल डिस्टसिंग ठेवण्यासंदर्भात वारंवार सांगत आहेत. जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन, महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने २४ तास नांदेडकरांसाठी कार्यरत असतातंनाही नांदेडकर मात्र गाफिल राहत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे आकडेवारी समोर येत आहे. नांदेड शहरासह जिल्ह्यातही आता कोरोनाने मुसंडी मारली आहे. प्रत्येक घरात एखादा तरी कोरोनाबाधीत रुग्ण सापडत आहे. जिल्हा प्रशासनाची आरोग्य सेवा आता तोकडी पडत आहे.

शहरामध्ये आरटीपीसीची तपासणी तोकडी पडली असल्यामुळे अनेकांना अ‍ॅन्टीजेन टेस्ट करावी लागत आहे. अ‍ॅन्टीजेन टेस्टचा निकाल उशिरा येत असल्यामुळे बाधीतांच्या संख्येत वाढ होत आहे. लसीचा देखील तुटवडा होत असल्याचे दृश्य समोर आले आहे. काही महिन्यापुर्वी अनेक खाजगी रुग्णालयांनल लस देण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. परंतु त्या रुग्णालयाने आता कोव्हीड रुग्णालयात रुपांतर केल्यामुळे त्या ठिकाणी लस घेतलेल्या व्यक्तीला आता दुसरीकडे जाण्याची वेळ आली आहे. यावर देखील कोणाचे अंकुश नसल्याचे दिसुन येत आहे. शहरातील पोलिस कुठल्याही प्रकारची कडक कारवाई करण्यास तयार नाहीत.

सध्या असलेले लॉकडाऊ न हे असून नसल्यासारखे असल्यामुळे पोलिसांनी देखील कडक पाऊ ले उचलेली नसल्यामुळे अनेक नागरिक संचारबंदीची पायमल्ली करतांना दिसून येत आहेत. यामध्ये राजकीय पुढारी देखील कमी नाहीत. नुकत्याच झालेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीनंतर सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडाल्याचे दृश्य पहावयास मिळाले. याठिकाणी अतिषबाजी करुन अकलेचे तारे तोडल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात पालकमंत्र्यांनी संताप व्यक्त केला असून जे काही झाले ते चुकीचे झाले असल्याचे त्यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर आपले मत व्यक्त केले आहे. नांदेडकरांसाठी आता कडक लॉकडाऊ न हा एकच पर्याय समोर येत आहे. कडक लॉकडाऊ न झाले नाही तर ब्रेक द चेन होणे अवघड दिसत आहे. आपल्या डोळ्यांनीच नांदेडकरांना आपल्या नातेवाईकांचा मृत्यू पाहण्याची वेळ लवकरच येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अपहरण करून बालकाला जीवे मारण्याचा प्रयत्न

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या