18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeनांदेडखड्ड्यांनी घेतला साता-याच्या महिला रायडर्सचा बळी

खड्ड्यांनी घेतला साता-याच्या महिला रायडर्सचा बळी

एकमत ऑनलाईन

अर्धापुर : वाहनधारकांसाठी मृत्युचा सापळा बनलेल्या नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांनी मंगळवारी सकाळी पुन्हा एक बळी घेतला. दुर्दैवाची बाब म्हणजे रस्ते सुरक्षाविषयी माहिती देण्यासाठी निघालेल्या साता-याच्या हिरकणी महिला रायडर्सचा भोकर फाट्याजवळ कंटेनरने दुचाकीला दिलेल्या धडकेत जागीच मृत्यु झाला.

याबाबत मिळालेली माहिती अशी सातारा येथील हिरकमणी महिला रायडर्स ग्रुपच्या वतीने साडेतीन शक्तीपीठाची नवरात्र उत्सव निमित्ताने दुचाकीवरून दर्शन यात्रा करून महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर व रस्ते सुरक्षा जनजागृतीसाठी काढण्यात आली होती. या यात्रेला रविवार दि.१० रोजी सुरुवात झाली. ही यात्रा कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुका, वणीची सप्तश्रृंगी या साडेतीन शक्तीपिठाची अशी होणार होती.

ही यात्रा दहा जिल्हे, २५ तालुके, एक हजार ८६८ किलोमीटर प्रवास करुन दि.१५ सातारा येथे सांगता होणार होती. ग्रुप प्रमुख मनिषा फरांदे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या यात्रेत शुभांगी पवार, अंजली शिंदे, मोनिका निकम (जगताप), अर्चना कुकडे, केतकी चव्हाण, ज्योती दुबे, श्रावणी बॅनर्जी, भाग्यश्री केळकर यांचा समावेश होता. या यात्रेला सातारा येथील पवई नाका परिसरातील शिवतीर्थपासून छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थित प्रारंभ झाला होता. ही यात्रा कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेऊन तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन नांदेडमार्गे माहुरला जात होती.

सात दुचाकी खड्डेमय राष्ट्रीय महामार्गावरून नांदेडमार्गे माहुरला जात असताना मंगळवारी सकाळी भोकरफाटा परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शुभांगी संभाजी पवार वय ४२ रा.सातारा यांच्या एमएच ११ सीए १४४७ या दुचाकीला भरधाव वेगाने येणा-या कंटेनर जीजे १२ एटी ६९५७ ने जबर धडक दिली. यात शुभांगी पवार यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या मृत्यूमुळे या यात्रेत सहभागी झालेल्या महिलांनी एकच टाहो फोडला.गेल्या वर्ष भरापासून नांदेड-नागपूर-तुळजापुर या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे.सदर काम अंत्यत मंद गतीने होत आहे.यात कामासाठी रस्ता खोदून ठेवला आहे.यामुळे रस्त्यावरील खड्डे वाहनधारकांसाठी मृत्युचा सापळा बनले आहेत.आतापर्यंत अनेक बळी गेले आहेत.यात मंगळवारी पुन्हा साता-याच्या महिला रायडर्सचा जीव घेतला आहे.या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून चालकास ताब्यात घेण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या