22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeनांदेडमराठा आरक्षणाचे नांदेडात पडसाद

मराठा आरक्षणाचे नांदेडात पडसाद

एकमत ऑनलाईन

नांदेड: मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाल्याने संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष ना.अशोकराव चव्हाण यांच्या नांदेड जिल्हयात गुरूवारी याचे तीव्र पडसात उमटले.आसना पुलाजवळील मुख्य रस्त्यावर दुपारी चक्काजाम तर लोहा शहरात अर्धनग्न आंदोलन करण्यात आले.सर्वत्र संयमाची भुमिका घेतली असताना मराठवाड्यातील केवळ नांदेडात आंदोलन झाले आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणावर बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निवाडा देत मराठा आरक्षण रद्द ठरविले आहे.या निर्णयानंतर मराठा समाजात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.मात्र समाजातील मान्यवर नेते,मंत्री,पदाधिकारी यांच्या आव्हानानंतर राज्यात मराठा समाज बांधवांनी संयमाची भुमिका घेतली आहे.परंतू मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा सा.र्वजनिक बांधकाममंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नांदेड जिल्हयात गुरूवारी आरक्षण रद्द झाल्याचे तीव्र पडसात उमटले.आसना पुलाजवळील मुख्य रस्त्यावर दुपारीच्या वेळी मारुती वाघ मित्र मंडळाकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

रस्त्याच्या मधोमध वाहनांचे टायर जाळण्यात आले.जवळपास तासभर झालेल्या चक्काजाम आंदोलनामुळे आसनाच्या दुर्तफा रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होऊन वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. या आंदोलनात शिवाजी धुमाळ ,चक्रधरकोकाटे ,गौरव पाटील,भगवानलामदाडे ,कैलास बोरकर ,संतोष एम्कुरे, भिमराव येवले,समीर पुरी, तुळशीराम क्षिरसागर , राम क्षिरसागर ,ज्ञानेश्वर क्षिरसागर, गजानन क्षिरसागर ,अक्षय बोरकर, सोपान पावडे ,निखील कोकाटे ,कृष्णा कोकाटे, अरुण पोपळे , कृष्णा इंगोले, बालाजी पावडे हनुमान हुंबाड यासोबत अनेक मराठा_ तरुण सहभागी झाले होते.पोलिसांनी या आंदोलनातील तरूणांना ताब्यात घेऊन काही वेळाने सोडून दिले.

तर लोहा शहरातील भाजी मंडई परिसरात मराठा ठोक क्रांती मोर्चाच्या वतिने अर्धनग्न आंदोलन करण्यात आले.यावेळी कार्यकर्त्यांनी आरक्षण आमच्या हक्काचे,नाही कोणाच्या बापाचे अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. केंद्र सरकारवर राज्य सरकारकडून मराठा समाजाचा केवळ आतापर्यंत वापर केला गेला. केवळ मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले असून आता मराठा आरक्षाणची जबाबदारी एकमेकावर ढकलण्याचे काम दोन्ही सरकारने केले आहे. आरक्षणासाठी गेल्या अनेक वर्षापासून समाजाला संघर्ष करावा लागत आहे. याची सरकारने दखल घ्यावी अन्यथा पुढील काळात आंदोलन करण्यात येईल असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला.

काँग्रेसला आत्मपरीक्षणाची गरज; कपिल सिब्बल यांचा काँग्रेसला घरचा आहेर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या