32 C
Latur
Tuesday, March 9, 2021
Home नांदेड लोहा बंदच्या अव्हानाला व्यापा-याचा व नागरिकांचा प्रतिसाद

लोहा बंदच्या अव्हानाला व्यापा-याचा व नागरिकांचा प्रतिसाद

एकमत ऑनलाईन

लोहा : लोहा शहर व ग्रामीण भागात कोरोना या संसर्गजन्य रोगाने थैमान घातले असून दिवसे न दिवस कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत असल्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लोहा न.पा.ने दि‌.२८ ऑगस्ट ते १ सप्टेंबर पर्यंत असे पाच दिवस बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयाला लोहा शहरातील व्यापारी दुकानदारांनी व लोहा शहरातील नागरिकांनी स्वता जनता कर्फ्यु पाळुन प्रचंड प्रमाणात प्रतिसाद दिला असून लोहा शहर100% कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे.

कोवीड सारख्या महामारीच्या काळात नागरिकांची आरोग्य चांगले रहावे तसेच कोरोनाचा वाढता संसर्ग थांबावा त्यासाठी नगर परिषद व व्यापारी यांनी लोहयातील बाजार पेठ बंद करण्याचा निर्णय घेतला परंतु नको त्या ठिकाणी नागरिकांच्या आरोग्याची काळजी न घेता राजकारण करणा-यांना आणि दुकाने चालू ठेवा असे आवाहन करणा-यांची व्यापा-यांनी दखल घेतली नसून लोहा बंद झाले परंतु व्यापारा पेक्षाही जीव महत्वाचा आहे याला प्राधान्य देत लोहा बाजार पेठ पूर्णत: बंद होती.

लोहा शहरातीतील व ग्रामीण भागातील असे सहा जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे लोहा शहरातच ११० जनाना कोरोणा चा संसर्ग झाला आहे तर ग्रामीण भागात ७५ जणांना कोरोणाची बाधा झाली आहे. मागील आठवड्यापासून शहरात दररोज दहा ते पंधरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत शिवाय व्यापारी व इतर व्यवसायिक यांनाही मोठ्या प्रमाणात या रोगाचा संसर्ग होत असल्याने दिसून आले आहे.

नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी, उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार व सर्व नगरसेवक याची या संदर्भात व्यापक बैठक झाली व बाजारपेठेत होणारी गर्दी लोकांकडून प्रतिबंधक उपाय योजनेकडे होणारे दुर्लक्ष पाहता कोरोना चा संसर्ग झपाट्याने वाढत आहे आरोग्य विभागाने चिंता व्यक्त केली. खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष व त्यांच्या सहका-यांनी लोकांच्या आरोग्याचा विचार करून निर्णय घेतला दुकानदारांचा व्यापा-यांचा तसेच शहरातील जनतेचा जीव महत्वाचा आहे व्यापार महत्वाचा नाही म्हणून बंदला प्रचंड प्रतिसाद दिला व विरोध करणारांना एक प्रकारे अप्रत्यक्ष पने चांगलीच चपराक दिली.

कडकडीत बंद पाळुन दाखऊन दिले की आम्ही संकटाच्या काळात नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांच्या सोबत खंबीर पने उभं आहोत असेच दिनांक २८ ऑगस्ट ते दिनांक १ सप्टेंबर पर्यंत व्यापारी दुकानदारांनी व लोहा शहरातील जनतेने प्रतीष्टित नागरिकांनी पत्रकारांनी लोहा नगर परिषदेला आज केले तसे सहकार्य पुढिल चार दिवस करावे असे आव्हान जाहीर आव्हान नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी ,उपनगराध्यक्ष शरद पवार ,मुख्य अधिकारी अशोक मोकले व सर्व नगरसेवकांनी केले आहे.

महाबळेश्वर विकायला काढलेल्या २ भामट्यांना अटक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,444FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या