36.4 C
Latur
Wednesday, May 25, 2022
Homeनांदेड‘मिशन ब्रेक दि चैन’ मोहीमेस व्यापारी,नागरिकांचा प्रतिसाद

‘मिशन ब्रेक दि चैन’ मोहीमेस व्यापारी,नागरिकांचा प्रतिसाद

एकमत ऑनलाईन

कुंडलवाडी: कुंडलवाडी शहरात कोरोनाच्या पार्श्वभुमीवर पाच दिवसाचा मिशन चैन ब्रेक मोहिमेस शुक्रवार दि़ १० रोजी पहिल्याच दिवशी व्यापाºयांस नागरिकांचा प्रतिसाद मिळाला.

दि. १० रोजी पासून सुरूवात झाली जुलै ते १४ जुलै दरम्यान स्वयंघोषीत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. पहील्या दिवशी शुक्रवार आठवडी बाजार असतांनाही भाजीपाला व फळ विक्रेते,किराना भुसार,कृषी,सोनाचांदी,हॉटेल आदी व्यापाºयांनी आपआपली दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळला़यामुळे गल्ली बोळीतीलसह मूख्यबाजारात शुकशुकाट दिसून आला.

शहरातील पोलीस ठाण्यातील वाहान चालक व एक अधिकारी दोघाचा अहवाल पॉझीटिव्ह आल्याने शहरात कोरोना विषाणु प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा उपाय करण्यात आला आहे़ पोलीस ठाणे परिसर व अधिकारी निवास परिसर कंटेनमेंट झोन फलक लावुन बंद करण्यात आले.प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे सबंधीत परिसरातील नागरीकांचे थर्मल गणना करण्यात येत आहे.

पोलीस ठाण्यात नगर परिषद तर्फे जंतुनाशक फवारणी करण्यात येवुन नगरपरिषदेचा कर्मचारी तैनात करण्यात आले.तसेच सर्व नागरीकांनी पाच दिवसाचा लागु केलेल्या कोरोना चैनब्रेक लॉकडाउनला स्वफूतीर्ने सहकार्य करावे असे आवहान नगराध्यक्षा डॉ.सौ.अरूणा कुडमूलवार,उपाध्यक्ष डॉ.विठ्ठल कुडमूलवार,मुख्याधिकारी जी.एस.पेन्टे व सर्व व्यापा-यातर्फे करण्यात आले होते.

Read More  कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी ‘मिशन ब्रेक दि चैन’

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या