नांदेड : लष्करी भरतीसाठी केंद्राने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेविरोधात सिकंदराबाद येथील रेल्वे स्थानकावर जाळपोळीच्या हिंसक आंदोलन झाले. या आंदोलनामुळे शुक्रवारपासून रेल्वे सेवा विस्कळीत झाली असून सलग दुस-या दिवशी शनिवारी नांदेडहून ये-जा करणा-या गाड्यांवरही परिणाम झाला आहे. यात शिर्डी, अजिंठा एक्स्प्रेस, पटना-पुर्णा या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
तेलंगणातील सिकंदराबादमध्ये शुक्रवारी (दि. १७) रोजी रेल्वेस्थानकावर लष्करी भरतीसाठी केंद्राने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेच्या विरोधातील हिंसक आंदोलन झाले़ आक्रमक तरूणांनी रेल्वे स्थानकावर उभी असलेल्या रेल्वेला जाळण्यात आले़ या आंदोलनामुळे तणाव निर्माण झाला असून रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे.
आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर दक्षिण मध्य विभागातून धावणा-या शुक्रवारी श्रीसाईनगर शिर्डी, अजिंठा एक्स्प्रेसह अनेक रेल्वे रद्द करण्यात आल्या होत्या. काही रेल्वे अंशत: रद्द, तर काही वळवण्यात आल्या होत्या. तर देवगिरी एक्सप्रेस काही तास उशिराने धावली होती.
त्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. तणाव अजूनही कायम असल्याने सलग दुस-या दिवशी शनिवारी दि.१९ जून रोजी मनमाड रेल्वे स्थानकावरुन सुटणारी गाडी संख्या १७०६३ मनमाड- सिकंदराबाद अजंठा एक्स्प्रेस रद्द ही गाडी रद्द करण्यात आली आहे.
यासह दि. १८ जूनला श्री साईनगर शिर्डी रेल्वे स्थानकावरुन सुटणारी गाडी संख्या १७००१ श्रीसाईनगर- शिर्डी -सिकंदराबाद एक्स्प्रेस, पटना रेल्वे स्थानकावरुन सुटणारी गाडी संख्या १७६०९ पटना- पूर्णा एक्स्प्रेस अशा तिन रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्यात आहे.