नांदेड : ऑपरेशन मुस्कान अंतर्गत आई नसलेली तीन बालके घर सोडून निघून गेली होती. मात्र भोकर पोलिसांनी तातडीने याबाबत हालचाली करून या तीन बालकांना शोधून काढले़ यानंतर त्यांना आजोबांच्या ताब्यात देण्यात आले.
पोलिसांनी जून महिन्यात ऑपरेशन मुस्कान अंतर्गत घरातून गायब असलेल्या बालकांना शोधण्याची एक मोहीम हाती घेतली आहे. भोकर तालुक्यातील धावरी (खु) या गावातील करण वय ८, आदर्श वय ९ आणि प्रभू गणेश चव्हाण वय १० हे तिन्ही भाऊ आपल्या आजोबांकडे राहात होते. त्यांची आई त्यांना सोडून गेली होती.
बालकांच्या आजोबानी भोकर पोलीस ठाण्यात येऊन आपल्या घरातील तीन नातू निघून गेल्याची माहिती दिली होती. या अनुषंगाने भोकरचे पोलीस निरिक्षक विकास पाटील यांनी त्वरीत पोलीस अंमलदार देवकांबळे आणि जाधव यांना या बालकांचा शोध घेण्यासाठी पाठवले तेंव्हा ही तीन भाऊ एकत्रीतच नांदेड शहरात सापडली.
देवकांबळे आणि जाधव यांनी बालकांना सुखरुप भोकर येथे नेले आणि पोलीस निरिक्षक आणि विकास पाटील यांनी या बालकांना आजोबांच्या ताब्यात दिली़ ऑपरेशन मुस्कान ११ अंतर्गत पोलीस विभाग या महिन्या विशेष काम करणार आहे.