19.1 C
Latur
Saturday, January 16, 2021
Home नांदेड गोजेगाव येथील पाझर तलाव फूटला

गोजेगाव येथील पाझर तलाव फूटला

एकमत ऑनलाईन

मुक्रमाबाद : तब्बल पंधरा दिवसापासून मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद परिसरात मुसळधार पावसाने हाहाकार माजविला असून गेल्या दोेन दिवसात परिसरात झालेल्या मुसळधार पावासाने गोजेगाव येथील पाझर तलाव मंगळवार दि २२ रोजीच्या राञी फुटला.यामुळे तलावा खालची शेकडो हेक्टर शेती खरडून गेल्याने शेतक-यांची सोयाबीन, तूर, उडीद,ज्वारी आदी पिके वाहून गेली आहेत.

मुक्रमाबाद मंडळात यंदा सुरूवातीपासूनच जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. आतापर्यत तब्बल चार वेळा अतिवृष्टी झाली असून लेंडी नदीसह नाले,ओढे हे,भरभरून वाहत आहेत. तर सर्वच पाझर तलाव हे, तुडुंब भरले असून या तलावाच्या मुख्य तटभिंती वरून व सांडव्यावरून पाणी हे.भरभरून वाहत असल्यामुळे तलावाच्या तटभिंतीला मोठे भगदाड पडले आहेत. तर गावक-यांनी प्रशासनाला याची माहिती देऊनही प्रशासन हे, अशा धोकादायक तलावाची डागडूजी करण्यासाठी काहीच उपाय योजना केली नसल्यामुळे पाझर तलाव फुटून शेतक-यांचे लाखोचे नुकसान होत आहे.

परीसरात सतत मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे जवळपास सर्वच पाझर तलाव हे, धोक्याची पातळी ओलांडली असून तटभिंतीवरून पाणी वाहत आहे. गेल्या दोन दिवसापासून मुक्रमाबाद परिसरात मुसळधार पाऊस होत आहे. या पावसाने मंगळवारी दि.२२ रोजी गोजेगाव येथील तलाव हा रात्रीच्या वेळी अचानक फुटल्यानंतर गावात पाणी शिरल्यामुळे गावातील अनेक लोकांनी एकमेकांना सा करत घराच्या छतावर तर काही जण उंच ठिकाणी सुरक्षित स्थळी धाव घेतली.यामुळे मोठी हानी टळली. परंतू शेतात हाताशी आलेली सोयाबीन, तूर, उडीद,ज्वारी आदी पिके वाहून गेली आहेत. तलाव फुटीमुळे शेतात मोठे दगड येऊन साठली असून शेतीला सर्व वाळवंटाचे स्वरूप आले आहे.शेतातील उभे पीक वाहून गेल्यामुळे शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे.

दरम्यान कोट्ग्याळ येथील पाझर तलावाच्या तटभिंतीवरून पाणी वाहत असल्यामुळे हा तलाव कोणत्याही क्षणी फूटून कोट्ग्याळ व गोजेगाव येथील शेतीचे व नागरिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता बळावली आहे. प्रशासनाने उपाययोजना केल्यामुळे नागरिकांच्या जिवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. शासनाने शेतक-यांना आर्थिक भरपाई देऊन त्यांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.

कंधार येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या बांधकामासाठी 30 कोटी 88 लक्ष रुपयांच्या कामास प्रशासकीय मान्यता

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,408FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या