36.2 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeनांदेडस्वयंघोषित भाग्यविधाते आहेत खासदार प्रताप पाटील चिखलीकर -आमदार शामसुंदर शिंदे

स्वयंघोषित भाग्यविधाते आहेत खासदार प्रताप पाटील चिखलीकर -आमदार शामसुंदर शिंदे

एकमत ऑनलाईन

कंधार (सय्यद हबीब) : लोहा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी निधी परत गेला असल्याचे आरोप आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या समर्थकांकडून केला जात असल्याने त्याचे खंडन आमदार शामसुंदर शिंदे यांनी केले आहे चिखलीकर हे स्वयंघोषित नेते आहेत त्यांनी स्वतःच्या गावात मंजूर असलेले आरोग्य केंद्र आणता आले नाही ते आमदार असताना काय दिवे लावले हे सर्व जनतेला माहित आहे असा आरोप आमदार शिंदे यांनी करून सर्वसामान्य जनतेची दिशाभूल खपवून घेणार नाही असा इशारा कंधार येथील त्यांच्या संपर्क कार्यालयातील पत्रकार परिषदेत दिला.

आ.शिंदे म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारणे बाबत मी शासनाला पत्र लिहिले आसता त्यांनी मला उत्तर दिले, खा. प्रतापराव पाटील चिखलीकर लोकसभा सदस्य यांच्या दि. २९ जुलै २०१९ रोजी च्या पत्राच्या अनुषंगाने “लोहा शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारणे व सुशोभिकरण करणे रुपये दीड लक्ष” या कामात शासन पत्र क्रमांक पूरक २०१९ प्र क्र ७७ (८२) /न.वि.१६ दि.३१ जुलै २०१९ अन्वये मान्यता देण्यात आली होती व या बाबतचा प्रस्ताव सादर करण्याबाबत जिल्हाधिकारी नांदेड यांना दि.३१ जुलै २०१९ रोजी कळविण्यात आले होते तथापि, विहित मुदतीत प्रस्ताव शासनास प्राप्त न झाल्याने सदरच्या कामाचा निधी व्यपगत झाला. आपल्या संदर्भाधीन पत्राच्या उपस्थित केलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने स्पष्ट करण्यात येते की नांदेड जिल्ह्यातील किंवा महाराष्ट्रातील आमदाराने किंवा लोकप्रतिनिधीने सदरचा निधी स्थगित करण्याबाबत शासनास पत्रव्यवहार केलेला नाही असे उत्तर शासनाकडून मिळाल्याचे यावेळी सांगितले.

लोहा शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी व स्मारकासाठी मी स्वतः आमदार या नात्याने नगर विकास विभागाला वेळोवेळी पत्रव्यवहार करून व मंत्रालय स्तरावर प्रत्यक्ष भेटून पाठपुरावा केलेला आहे, पण लोह्याचे नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांनी पत्रपरिषदेत आमदार शिंदे यांनी शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा केलेला नसल्याच्या वावड्या विरोधकांकडून उठवल्या जात असून जो नगराध्यक्ष लबाड, स्वयंघोषित भाग्यविधाताच्या, मार्गदर्शनाखाली माझ्यावर खोटेनाटे आरोप करतो या नगराध्यक्षांनी त्यांच्या कार्यकाळात लोहा शहरा मध्ये कोण कोणते काळे दिवे लावले आहेत हे लोह्यातील सर्व जनतेस माहित आहे.

एक आमदार म्हणून कुठल्याही पक्षाचा आमदार महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या निधी ला विरोध करूच शकत नसल्याचेही आमदार शामसुंदर शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले .खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आपल्या आमदारकीच्या कारकिर्दीत किती काळे दिवे लावले आहेत हे नांदेड जिल्ह्यतील सर्व सामान्य जनतेला माहित आहे, खोटेनाटे बोलणे भपकेबाजी, भंपक बाजी करून लोहा-कंधार तालुक्यातील जनतेची दिशाभूल करणे हा खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा जन्मजात पिंड असल्याची संतप्त प्रतिक्रिया यावेळी आमदार शामसुंदर शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कंधार-लोहा तालुक्यातील जनतेची खोटेनाटे, भपकेबाजी करून दिशाभूल करणे थांबवा, चार कार्यकर्त्यांच्या कानात फूस घालून सांगितल्याने लोकनेता भाग्यविधाता होत नसल्याचेही आमदार शिंदे यांनी बोलताना स्पष्ट केले. खासदार प्रताप पाटील चिखलीकर स्वयंघोषित, भाग्यविधाते म्हणून जिल्ह्यात, मिरवतात, नांदेड जिल्ह्यतील बाकी 6 मतदारसंघात खासदार म्हणून काय दिवे लावले आहेत हे सर्वांना माहीत आहे, स्वयंघोषित भाग्यविधाते, खासदार चिखलीकर यांनी सर्वप्रथम कंधार-लोहा तालुक्यातील जनतेला व नांदेड जिल्ह्यातील जनतेला खरे, सत्य बोलण्याचा व सत्य काम करण्याचा प्रयत्न करावा व माझ्यावर खोटेनाटे आरोप करू नयेत असा संतप्त इशारा आमदार शिंदे यांनी चिखलीकर यांना लगावला.

मेहरबानी समजा की सध्या सभाग्रहाचे अधिवेशन चालू नसून अधिवेशन चालू असेले तर खासदार चिखलीकर यांनी घेतलेल्या सर्व खोट्या नाट्य, भपकेबाज श्रेयावर हक्कभंग आणणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत आमदार शामसुंदर शिंदे यांनी दिली .यावेळी पत्रकार परिषदेस सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे, कंधार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर पाटील चोंडे, उपसभापती अरुण पाटील कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील शिंदे, युवा नेते रोहित पाटील शिंदे सह कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

कायदा सशक्त, पोलीस कर्तव्य कठोर असतील तरच समाज निर्भय राहिल-सातपुते

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या