हिमायतनगर : प्रतिनिधी
लग्न समारंभात झालेल्या शाब्दीक चकमकीनंतर दोन गटात दगडफेक करीत हाणामारी झाल्याची घटना शहरातील चौपाटी परिसरात दि. १३ मार्च रोजी सायंकाळी घटली. दरम्यान यावेळी झालेल्या दगडफेकीत ग्रामीण रुग्णालयाचे ही नुकसान झाले. या प्रकरणी हिमायतनगर पोलिसांनी १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की दिनांक १३ मार्च रोजी सायंकाळी एका लग्न समारंभात बाबू सटवा आलेवार रा. गारगव्हाण ता. हदगाव यांचा हिमायतनगर शहरातील काही तरूणांसोबत शाब्दीक वाद झाला, त्या वादाचे रूपांतर नंतर मोठया भांडणात झाले.
शहरातील चौपाटी परिसरात दोन गटाने आमनेसामने येऊन भर रस्त्यावर दगडफेक केली. यात हिमायतनगर शहरातील ग्रामीण रुग्णालयाची काचे फोडली. तर उपस्थित पोलिस कर्मचा-यांना आमच्या भांडणामध्ये पडू नका, चल इथून निघून जा या भाषेत धमकावून शासकीय कामात अडथळे निर्माण केला.
या प्रकरणी १५ जणांविरुद्ध हिमायतनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दगडफेीच्या या घटनेमुळे शहरात काहीवेळ तनावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिस या घटनेतील आरोपींचा शोध घेत आहेत.