नांदेड : शहरात दिवसेंदिवस लुटमार, घरफोडी, दरोडा आशा घटनात वाढ होत असून, चोरट्यांनी दि़१२ जूनच्या रात्री शहरातील शिवरोड परीसरात एका दुचाकीस्वारास अडवून त्याच्याकडी नगदी रूपये व एक सोन्याची अंगठी असा २१ हजार २०० रूपयाचा ऐवज जबरी चोरून नेला़ या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील शिवनगर भागात राहणारे संतोष किशन जोंधळे हे मनपुरम गोल्ड लोन येथे काम करतात. ते दि़१२ जून रोजी रात्री १०़४५ वाजेच्या सुमारास पासदगाव जवळील एका पेट्रोल पंपावर पेट्राल टाकून येत असताना अज्ञात दोन चोरट्यांनी त्यांना रस्त्यात अडवले.
तसेच दमदाटी करून चोरट्यांनी त्यांच्याजवळील नगदी बाराशे रूपये व २० हजार रूपये किंमतीची ५ ग्रॅम सोन्याची अंगठी असा २१ हजार २०० रूपयाचा ऐवज जबरी चोरून नेला़ या प्रकरणी संतोष जोंधळे यांच्या फिर्यादीवरून भाग्यनगर पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सपोनि एस़एस़ पाटील हे करीत आहेत.