हिमायतनगर : कोविड – १९ च्या लॉकडाऊन शिथिलतेनंतर शहरासह तालुक्यात अवैद्य धंद्यांनी डोके वर काढले आहे. जुगार, गुटखा, मटका हे धंदे राजोसपणाने सुरु आहेत तसेच देशी व हातभट्टी गावठी दारूची अवैद्य विक्रीने धुमाकूळ घातला आहे. तर जुगाराचे डावही चालविले जात असल्याने अनेकांचे संसार देशोधडीला लागत असून, याचा नाहक त्रास महिला मंडळींना सहन करावा लागत आहे. त्रस्त झालेल्या हिमायतनगर तालुक्यातील दरेसरसम ग्रामपंचायती, भिश्याची वाडी येथील दुर्गा मंडळ, बचत गटाच्या महिलानी सामाजिक संस्थेचे सचिव, पोलीस पाटील, सरपंचांना सोबत घेऊन गुरुवार दि.२२ रोजी पोलीस ठाणे गाठून निवेदन दिले. दारुड्यांचा बंदोबस्त करून जुगाराचे डाव बंद करावे. तसेच गावात ग्रामसुरक्षादल स्थापन करून त्यानं पकडण्याचे अधिकार द्यावे अन्यथा आम्ही कायदा हातात घेऊ असा इशारा दिला आहे.
सध्या नवरात्रोत्सव सुरु असताना देखील या काळात गावात दारुड्यांचा उच्छाद वाढला आहे. याचा नाहक त्रास उत्सवाच्या काळात महिलांना सहन करावा लागत असल्याने संतप्त झालेल्या २०ते २५ महिला आणि १० ते १५ पुरुषांनी हा प्रकार कुठे तरी थांबला पाहिजे आणि गावातील शांतता टिकून राहिली पाहिजे या उद्देशाने सिप्रा सामाजिक संस्थेचे सचिव, पोलीस पाटील, सरपंचांना पुढे करून हिमायतनगर पोलीस स्थानकावर मोर्चा आणला. यावेळी पोलीस उपनिरीक्षक महाजन यांच्याशी चर्चा करून दारुड्यांचा आणि शासनाची कोणतीही परवानगी नसताना अवैद्य रित्या हातभट्टी गावठी दारू तयार करणारे आणि दारू विक्री करणा-्यांचा बंदोबस्त करावा. तसेच गावामध्ये एक ग्रामसुरक्षा पथक स्थापन करून यात काही महिलांचा समावेश करण्यात यावा. जेणेकरून दारूविक्रीला लगाम लावण्यात यश येईल आणि पथकातील कोणत्याही व्यक्ती संपर्क केल्यास तात्काळ पोलिसांनी गावात दाखल होऊन दारू विक्रेते आणि जुगार खेळणा-्या व खेळविणा-यावर कायदेशीर कार्यवाही करावी अन्यथा आम्हला कायदा हातात घ्यावा लागेल असे काही महिलांनी बोलून दाखविले.
यावेळी सिप्रा सामाजिक संस्थेचे सचिव दिलीप राठोड, सरपंच रामराव भिसे, पोलीस पाटील सतीश रायपलवाड यांच्या नेतृत्वाखाली जय दुर्गा मंडळाच्या अध्यक्ष जनाबाई भिसे, उपाध्यक्ष पार्वताबाई भिसे, सचिव धुरपताबाई भिसे, सावित्रीबाई फुले स्वयंसाहात बचत गटाच्या अध्यक्ष लता डुडुळे, सचिव सुमनबाई देशमुखे, महात्मा ज्योतिबा फुले स्वयंसाहात बचत गटाच्या अध्यक्ष साविताबाई भुरके, जयवंतराव देशमुखे, विठ्ठल वानोळे, देविदास डोखले, खंडू भुरके, सोपान डुडुळे, रुखमाजी भुरके, किशन देशमुखे, श्यामराव भिसे, लक्ष्मण भिसे, पुंजाराम धुमाळे, माधव भिसे, पुंजाराम लोखंडे, आदींसह शेकडो महिलांच्या स्वाक्ष-यांचे निवेदन देण्यात आले आहे. महिला – पुरुषांच्या शिष्टमंडळाने आज दि.२२ रोजी पोलीस ठाण्यात भेट देऊन दारू आणि जुगारबंदी बाबत निवेदन देऊन ग्रामसुरक्षा दल स्थापन करण्याची मागणी केली आहे. याबाबत मी वरिष्ठाना सूचना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली वरील प्रकरणे बंद करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच अवैद्य धंदेवाल्याना अटक करून अद्दल घडविणारं असल्याचे हिमायत नगर येथील पोलीस स्टेशन चे कर्तव्य दक्ष सय्यक पोलीस उपनिरीक्षक बालाजी महाजन यांनी सांगितले.
चेन्नई एक्सप्रेस रुळावरून घसरली