हदगाव : सद्या तालुक्यासह सर्वच जिल्ह्यात मोबाईल टॉवर्स आणि नेटवर्क ची मोठी डोकेदुखी वाढली आहे. आयडिया, व्होडाफोन ,एअरटेल, जियो, आणि ईतर ही सर्वच कंपनीचे हीच अडचण येत आहे. या बाबतीत अनेक ग्राहक तक्रार निवारण विभागात तक्रार करण्याच्या तयारीत आहेत. कारण एक दिवस जर रिचार्ज संपले तर तात्काळ इन कमिंग कॉल्स बंद केले जातात. परंतु,500- 800 रुपये प्रति महिना पैसा खर्च करून सुद्धा सुविधा नसेल तर काय फायदा असा प्रश्न सर्व सामान्य ग्राहक वर्गास पडत आहे.. सद्या शाळा, कॉलेज बंद पण शिक्षण चालू राहावे या विचाराने ऑन लाईन शिक्षण चालू केले आहे पण जिल्ह्यात मोबाईल टॉवर्स आणि नेटवर्क ऑफ असल्यामुळे या मुलांच्या शिक्षणात खंड पडत आहे.
तसेच विविध बँक, पोस्ट ऑफिस, पोलीस प्रशासन, महसूल, जिल्हा परिषद, पे. युनिट, सहकारी संस्था, धर्मदाय कार्यालय, तहसील कार्यालय, तलाठी कार्यालय, सेतू सुविधा केंद्र आदी विविध ठिकाणी नेटवर्क ऑफ असल्यामुळे अनेक कामे खोळंबली आहेत. यातच कामचुकार कर्मचारी याच कारणाचा गैरफायदा घेऊन कामे पूर्ण करण्यास टाळटाळ करत आहेत. यावर वरिष्ठ पातळीवर आधिकारी सुध्दा मुक संमती देत आहेत. तेरी भी चूप, आणि मेरी भी चूप अशी अवस्था झाली आहे परंतु या सर्व बाबीत मात्र सर्व सामान्य माणूस पीचला जात आहे आहे हे मात्र खरं आहे. या बाबतीत न्यूज आरंभ लाईव्ह टीम ने एक सर्वे केला त्यात अनेक धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत.
अनेक टॉवर्स हे विना ऑपरेटर आहेत ,यास कोणीच वाली नाही. जनरेटर मध्ये पाणी साचून राहते, बंद आणि खराब अवस्था झाली आहे. मग आलेले डिझेल कोणाच्या घशात घातले जाते हे मात्र न सुटणारे कोडे आहे.
देखभाल करण्यासाठी नेमलेले एरिया सुपर वायझर गेले कुठे..?
टॉवर्स वर नेमलेले ऑपरेटर कुठं गायब राहतात.मग या सर्व कंपन्या ग्रहाकाना दिवसा ढवळ्या लुटत आहेत यावर वरिष्ठ पातळीवर चुप्पी का आहे…?संभधीत विभागाचे अधिकारी यांचे नियत्रन कोठे गेले…?
यावर तातडीने तोडगा निघावा अशी मागणी मोबाईल ग्राहक करत आहेत अन्यथा हे प्रकरण जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथील महाराष्ट्र शासन जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सदस्य मध्ये नेऊन यास मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे हदगाव पंचायत समिती चे उप सभापती व जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सदस्य श्री. शंकर मेंडके यांनी सांगितले आहे.
चंद्रभागा नदीकाठावरील घाट खचून भिंत कोसळली