उमरी : उमरी शहरासह फर्टिलायझर तालुक्यातील अडत, सीडस, किराणा आदी व्यापायांचा खरेदी केलेला माल थेट व कमीत कमी वेळेत यावा यासाठी येथील रेल उपभोक्ता समिती पारसमल दर्डा यांनी दक्षिण रेल्वे विभागाकडे उमरी शहराच्या नजीक असलेल्या शिवनगाव येथे रॉक पॉइंट व्हावा यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.
वरिष्ठ मंडळ परिचालन प्रबंधक वि . व्यंकना यांनी येत्या दोन महिन्यांत शिवनगाव रैंक पॉइंट करण्याचे आश्वासनव्यापायांसह विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकान्यांच्या शिष्टमंडळाला दिले आहे. याबरोबर सदर शिष्टमंडळाने निजामबाद ते नांदेड सवारी गाड़ी सुरू करण्याची मागणी निवेदनाद्वारे होणार – केली आहे. यावेळी शिवनगाव स्टेशनची पाहाणी दक्षिण मध्य रेल विभागाचे वरिष्ठ मंडळ परिचालन प्रबंधक बी. व्यंकना यांनी केली येथील उद्योग व्यवसायातून रैंक पॉइंटला किती माल उपलब्ध होईल या दृष्टिक्षेपातून येथील व्ही पी . साखर कारखाना परिसराची पाहणी करण्यात आली.
सदरील रॉक पॉइंट झाल्यास व्यापायांनी खरेदी केलेला माल व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला माल वेळेवर येईल, या मालाचे ट्रान्स्पोर्ट शन दर कमी प्रमाणात ला गेल , गरीब , मजुरांच्या व हमालीस्वरूपातून काम करणाऱ्यांच्या हाताला काम मिळेल , असे मत व्ही. पी. उद्योगसमूहाचे चेअरमन मारोतराव कवळे गुरुजी यांनी सांगितले .
यावेळी रेल उपभोक्ता समिती सदस्य पारसमल दर्डा माजी नगराध्यक्ष संजय कुलकर्णी बाल जी येरावार , फर्टिलायझर संघटनेचे उपाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख , गणेशराव पा . ढोलउमरीकर , प्रभू पुयड , वरिष्ठ स्टेशनमास्टर भरतलाल मीना , तिकीट कलेक्टर दिनेशकुमार मीना यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती .