34.4 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeनांदेडविष्णुपुरीत तीन दुकाने चोरट्यांनी फोडले

विष्णुपुरीत तीन दुकाने चोरट्यांनी फोडले

एकमत ऑनलाईन

नांदेड : कै. डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयासमोर नांदेड- लातूर महामार्गावरील मुख्य रस्त्यावर सोमवारी पहाटे तीन दुकानांचे शटर तोडून लाखो रुपयांची नगदी रोकड लंपास केल्याची घटना घडली. तर कौठा भागात बार अ‍ँड रेस्टारंटमधील देशी, विदेशी दारू १ लाख २२ हजाराची लंपास केली आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती.

शहरासह जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून विष्णुपुरी भागात मुख्य रस्त्यावर असलेल्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयासमोर सोमवारी पहाटे दोन मेडिकल दुकान व एका बेकरीचे शटर तोडून चोरट्यांनी दुकनातील नगदी रोकड लंपास केल्याची घटना घडली आहे. मुख्य रस्त्यावर असलेल्या रविंद्र हंबर्डे, विश्वजीत पाटील व हंबर्डे बेकरी या दुकानांचे शटरचे कुलूप तोडून चोरटयांनी आत प्रवेश केला. दुकानातील नगरदी गल्यात असलेले रुपये लंपास केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत सुरुच होती.

जिल्हा पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी लक्ष घालून रात्रीची पोलिस गस्त वाढवावी अशी मागणी व्यापा-यांनी केली आहे. शहरात चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असून चोरट्यांना पोलिसांची भीती राहिली नाही. विष्णुपुरी, कौठा, असर्जन या भागात रस्त्यावर नागरिकांना अडवून लुटमार केल्याच्या घटना ताज्या असतांनाच सोमवारी पहाटे विष्णुपुरी भागातील मुख्य रस्त्यावर एकाच वेळी तीन दुकाने फोडून चोरट्यांनी पोलिसांना सलामी दिली आहे. चोरट्यांचा बंदोबस्तत करण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागणार असून रात्रीची गस्त मोठ्या प्रमाणात वाढवावी लागणार आहे तरच चोरट्यांवर आवर घालता येईल. असे चित्र राहिले तर शहरात बिहार राज्यासारखी परिस्थिती निर्माण होण्यास वेळ लागणार नाही.

कौठा भागातील पुजा गार्डन हॉटेलच्या पाठिमागील शटर तोडून २८ फेब्रुवारी रोजी रात्री विदेशी दारूचे १२ बॉक्स किमंत १ लाख ४0 हजार व देशी दारू ८ हजार ७00 रुपये असे एकूण १ लाख २२ हजार रुपयांची दारू चोरट्यांनी लंपास केली. या प्रकरणी सुभाष निवृत्ती कांबळे हॉटेल मॅनेजर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

उमेदवारांची निवडणूक हिशेब देण्यास टाळाटाळ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या