20.8 C
Latur
Saturday, September 18, 2021
Homeनांदेडचोरट्यांनी पैशासह चक्क काऊंटर पळविले

चोरट्यांनी पैशासह चक्क काऊंटर पळविले

एकमत ऑनलाईन

नांदेड : हिमायतनगर शहरातील उमरचौक भागातील शंकर ट्रेडिंग कंपनी या दुकानाचे शटर वाकवून अज्ञात चोरट्यांनी गुरूवारी मध्यरात्री धाडसी चोरी केली. चोरटयांनी काउंटरचे कुलूप निघत नसल्याने चक्क काउंटरच पळविले. यानंतर दुर अंतरावर जाऊन नगदी रक्कम घेतल्यानंतर काऊंटर फेकुन देत पोबारा केला.या घटनेचा पोलिसांनी श्वान पथकाकडून माग काढण्याचा प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी ठरला.

हिमायतनगर शहर हे तालुक्याचे ठिकाण असून, येथील पोलीस ठाण्यात मोठा ताफा आहे. असे असूनही मागील काही दिवसापासून रात्र गस्ती कमी झाल्यामुळे चोरट्यांनी व्यापा-यांच्या दुकानाकडे लक्ष केंद्रित केले आहे. मागील महिन्यात राष्ट्रीय महामार्गावरील साईनाथ कोमावार यांच्या दुकानाचे शटर वाकवून रक्कम लंपास केली होती. त्या घटनेचा तपास लागला नसताना पुन्हा याचं दुकाना समोर असलेले सिरंजनी येथील अविनाश संगणवार यांच्या शंकर ट्रेडिंग कंपनी या दुकानाचे शटर वाकवून गुरूवारी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरटयांनी धाडसी चोरी केली. नेहमीप्रमाणे रात्रीचे ८ वाजता दुकान बंद करून व्यापारी संगणवार हे गावाकडे गेले होते.

बुधवारी दुकानात झालेल्या व्यवहाराचे पैसे काउंटरमध्ये होती.अज्ञात चोरटयांनी अगोदर शटर समोरील सीसीटीव्ही कॅमे-याचे तोंड फिरवून शटर वाकविले. यांतनर आत प्रवेश केला बरच वेळ काउंटचे लॉक तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो प्रयत्न असफल होत असल्याने चक्क येथील काऊंटरचा पळविले. हा सर्व प्रकार दुकानाच्या आतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. चोरटयांनी तोंडाला मास्क आणि अंगात काळे कपडे परिधान केल्याचे दिसून आले आहे. शहराच्याकडेला असलेल्या वॉर्ड क्रमांक १६ च्या बाजूने वाहणा-या नाल्याजवळ नेऊन काउंटरची तोडफोड करून त्यात असलेली लाखोंची नगदी रक्कम लंपास केली यानंतर काउंटरमध्ये असलेले आधार कार्ड, बैंक खाते बुक, चेक बुक इतर कागदपत्रे फेकून देत पोबारा केला. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक भगवान कांबळे, जमादार बालाजी लक्षटवार यानी भेट देऊन तपासणी केली.

दुकानाच्या आतील सीसीटीव्ही फुटेज पाहून श्वानपथक व ठसे तज्ञांच्या टिमला पाचारण केले. सकाळी १० वाजता पथक प्रमुख एच.सी. आयुब खान, एच. सी. पाटील, चालक नागरगोजे, श्वान ब्राऊनी, ठसे तज्ज्ञ प्रमुख डी. के. भुरे, एन.पी.सी. मुलमवाड, पीसी बोराळे दाखल झाले. यांनी सेवनास सुगंध देऊन तपास केला असता रात्रीला झालेल्या पावसामुळे अज्ञात चोरट्यांचा माग काढता आला नाही. घटनेचे गांभीर्य घेऊन दुपारी उपविभागीय अधिकारी जि.जि.राजनकर यांनी पोलीस ठाण्यास भेट देऊन घटनेचा आढावा घेतला.

सीसीटीव्ही कॅमे-यात चोरटे कैद
अज्ञात चोरटयांनी अगोदर शटर समोरील सीसीटीव्ही कॅमे-याचे तोंड फिरवून शटर वाकविले. यांतनर आत प्रवेश केला बराच वेळ काउंटचे लॉक तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो प्रयत्न असफल होत असल्याने चक्क येथील काऊंटरचा पळविले. हा सर्व प्रकार दुकानाच्या आतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे.

दूध दरवाढीसाठी रयत क्रांती संघटनेचे आंदोलन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या