अर्धापूर : नांदेड जिल्ह्यातील तेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गावे तालुक्याच्या हाद्दीशी सुसंगत होण्यासाठी शासनाने अधिसुचना जाहीर केली असून त्याद्वारे पोलिस महासंचालकांनी आदेश तसे काढले आहेत. यात अर्धापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गावांची पुनर्रचना करण्यात आली आहे. आधार्पूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सहा गावे निमगाव, भाग्यनगर, बारड, या ठाण्याला जोडण्यात आली आहेत. तर मानठा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हदगांव तालुक्यातील ती सात गावे आणि बारडचे पोलिस ठाणे हद्दीतील एक गाव अशी आठ गावे अर्धापूर पोलिस ठाण्याला जोडण्यात आली आहेत.
या निर्णयाचा हदगाव तालुक्यातून नव्यानेच अर्धापूर तालुक्यात समाविष्ट झालेल्त्याया त्या सात गावातील नागरिकांना फायदा होणार आहे. या संबधी नविन ठाण्याच्या हद्दीचे नकाशे तयार करणे, पोलिस ठाण्याच्या हद्दीचे फलक लावणे आदी सुचना करण्यात आल्या आहेत. या शासन निर्णयानुसार तातडीने कारवाई करण्यात यावी. अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.
अर्धापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत नांदेड, मुदखेड तालुक्यातील गावांचा समावेश आहे. या गावातील नागरिकांना न्यायालयीन तसेच पोलिस ठाण्याच्या कामांत खूप मोठी अडचण निर्माण होत होती. तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाला अडचणी निर्माण होत होत्या. ही अडचण दूर करण्यासाठी शासनाने नांदेड जिल्ह्याच्या तेरा पोलिस ठाण्यातील गावांची पुनर्रचना केली आहे. यात अधार्पूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चिखली, एकदरा, कांचननगर ही गावे लिंबगाव पोलिस ठाण्याला तर खैरगाव, नांदुसा ही गावे भाग्यनगर पोलिस ठाण्याला जोडण्यात आले आहेत.