23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeनांदेडपन्नास खोके घेतलेल्यांना पैसे देऊन सभेला गर्दी बोलवावी लागते

पन्नास खोके घेतलेल्यांना पैसे देऊन सभेला गर्दी बोलवावी लागते

एकमत ऑनलाईन

भोकर : माजी मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजर खुपसलेल्या चाळीस गद्धारांना शासकीय नियम काढून आणि पैसे देऊन सभेला गर्दी जमवावी लागते आहे. भाजपाच्या दावणीला बांधलेल्या चाळीस जनाचे भविष्य उध्वस्त झाले़ असुन आता शिवसेनेच्या युवा नेतृत्वाच्या वादळात गद्दारांची नौका बुडाल्याशिवाय राहणार नाहीत चाळीसच काय एकशे चाळीस जागा शिवसेना युवा नेतृत्वाच्या बळावर हस्तगत करेल अशा विश्वास युवा सेनेचे सचिव वरुण रसदेसाई यांनी माऊली मंगल कार्यालयाच्या सभागृहात मंगळवारी बोलताना व्यक्त केला.

शिवसेनेचे युवा नेतृत्व ग्रामीण भागांत मजबुत झाले पाहिजे यासाठी निर्धार मेळाव्याचे आयोजन पक्षाकडून करण्यात आल्याची माहिती माजी शहर प्रमुख माधव वडगांवकर यांनी दिली होती या अनुषंगाने शहराच्या डॉ.आंबेडकर चौकातून फटाक्यांच्या आतशबाजीत ढोल ताश्यांच्या गजरात सचिव सरदेसाई यांचे स्वागत केले.

ज्येष्ठ शिवसैनिक शिवाजी पा.किन्हाळकर यांच्या माऊली सभागृहात युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या उपस्थितीत निर्धार मेळावा कार्यक्रम ठेवण्यात आला.या अनुषंगाने मंचावर जिल्हाप्रमुख नागेश पाटील आष्टीकर, महेश खेडकर, युवासेना सहसचिव माधव पावडे, युवासेना जिल्हा अधिकारी गजानन कदम, युवती सेना विस्तारक गीताताई भागवत, युवतीसेना जिल्हाप्रमुख प्रियंका कुंभार, युवतीसेना जिल्हाप्रमुख रोहिणी कुलकर्णी,जिल्हा समन्वयक परमेश्वर पांचाळ यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाप्रमुख आष्टीकरांनी सुद्धा सत्ताधारी भाजपवर निशाना साधताना माज्या सोबत शिवसेनेच्या ताकदीवर आमदार झालेल्या कंगालाला श्रीमंत केले आणि त्याला इडीची भीती दाखवून भाजप वाल्यांनी सत्तेचे अमिष दाखवुन उचलला अशा गद्दार आमदाराला शिवसेनेचे त्यावेळी आमदार केले नसले असते तर भिकारी व्हावे लागले असते याचे तरी भान रहायला पाहिजे होते.

परंतु विश्वासघात हीच गद्दारांची मानसिकता बनली आहे.अशा शब्दांत जिल्हाप्रमुख आष्टीकरांनी प्रतिक्रिया दिली.यावेळी कृ.उ.बा.स.संचालक सतिश देशमुख,माजी शहर प्रमुख पांडुरंग वषेर्वार,प्रदीप दौलतदार तसेच युवासेना तालुका अधिकारी आनंद पाटील जाधव, युवासेना शहर अधिकारी कृष्णा पाटील कोंडलवार, तालुका समन्वयक अक्षयराज भोसले, तालुका चिटणीस रवन बोरगावे,मारोती पवार आणि समस्त युवासेना तसेच शिवसेना मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बालाजी येलपे डौरकर यांनी केले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या