27 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeनांदेडरसायनयुक्त पाण्यामुळे आसना नदीतील हजारो माशांचा मृत्यु

रसायनयुक्त पाण्यामुळे आसना नदीतील हजारो माशांचा मृत्यु

एकमत ऑनलाईन

नांदेड : पूर्णा, वसमत या भागातील साखर कारखान्यांचे मळीयुक्त व रसायनमिश्रित दूषित पाणी आसना नदीच्या पात्रात सोडण्यात आल्याने नदीतील हजारो माशांचा तडफडून मृत्यु झाल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. या संदर्भात माहिती मिळताच जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी स्वत: भेट देऊन या प्रकरणाची माहिती घेतली़ मात्र पुढे काय कारवाई झाली याची माहिती मिळू शकली नाही.

दोन वर्षांपूर्वी गोदावरी पात्रात रसायनयुक्त पाणी मिसळल्याने गोवर्धन घाट पूल परिसरात हजारो मासे मृत्युमुखी पडल्या होत्या. याबाबत पर्यावरण व प्रदूषण विभागाने दूषित पाण्यामुळे या माशांचा जीव गेल्याचा अहवाल महापालिकेला दिला होता. परंतू पुढे काहीच झाले नाही. पुन्हा असाच गंभीर प्रकार दि़ ६ जूलै रोजी सायंकाळच्या सुमारास आसना नदी पात्रात घडला आहे.

आसना नदीचे पाणी आलेल्या पुरामुळे अचानक लाल व काळे झाल्याचे दिसून आले़ हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील पूर्णा आणि वसमत येथील साखर कारखाने सध्या बंद झाल्याने जून महिन्यामध्ये सर्व कारखान्यातील मशीनची साफसफाई केली जाते. तसेच या परिसरात साखर कारखान्यांची मळी साचत असते. वरच्या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने पूर्णा आणि दुधना नदींना पूर आला व पुराचे पाणी, रसायनयुक्त दूषित पाणी आसना नदीत मिसळले. त्यामुळे आसना दूषित झाल्याने नदीपात्रात हजारो माशांसह अन्य जलचर प्राण्यांना जीव गमवावा लागला असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या