23.2 C
Latur
Sunday, June 26, 2022
Homeनांदेडभोकर तालुक्यात वीज पडून तीन मजूर ठार

भोकर तालुक्यात वीज पडून तीन मजूर ठार

एकमत ऑनलाईन

नांदेड\भोकर : अचानक सुरू झालेल्या जोरदार पावसात वीज पडून शेतात काम करणारे तीन मजूर जागीच ठार झाले़ ही दुर्दैवी घटना दि. २१ जून रोजी दुपारी पाचच्या सुमारास भोकर तालुक्यातील पाळज शिवारात घडली.

नांदेड जिल्ह्यात जवळपास पंधरा दिवसांच्या प्रतिक्षेनंतर पावसाचे आगमन झाले आहे़ मंगळवारी सलग दुस-या दिवशी मंगळवार दि़ २१ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला़ यावेळी पाळज ता़भोकर येथील रहिवासी साईनाथ सातमवार (वय ३०), राजेश्वर सतलावार (वय ४०) आणि बोजन्ना रामनवार (वय ३२) हे तिघे जण पाळज शिवारात एका शेतामध्ये काम करत होते. पाऊस सुरू झाल्याने हे तिघे मजूर एका झाडाखाली थांबले.

त्याचवेळी त्यांच्या अंगावर वीज पडल्याने तिघेही जागीच ठार झाले. ही माहिती मिळताच भोकरचे तहसीलदार राजेश लांडगे व त्यांचे पथक, पोलीस निरीक्षक विकास पाटील व त्यांची टीम यासह गावातील पोलीस पाटील, सरपंच यांसह शेतक-यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. सध्या तिन्ही मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी भोकर रुग्णालयात पाठविले आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या