25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeनांदेडतिरुपती दर्शन करून परतणारे डोंगरकड्याचे तीन भाविक ठार

तिरुपती दर्शन करून परतणारे डोंगरकड्याचे तीन भाविक ठार

एकमत ऑनलाईन

आखाडा बाळापूर/ शफी डोंगरगावकर

तिरुपतीचे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला निघालेले डोंगरकडा (ता. कळमनुरी) येथील ३ भाविकांचा कर्नाटकमध्ये क्रुझर गाडीला झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे डोंगरकडा गावात शोककळा पसरली आहे.

आखाडा बाळापूर पोलिस स्थानक अंतर्गत असलेल्या डोंगरकडा येथील २ कुटुंबातील भाविक क्रुझर गाडीने दि. २६ जुलै रोजी तिरुपती दर्शनाला गेले होते. या गाडीमध्ये चार महिला आणि चार पुरुष होते.तिरुपती दर्शन झाल्यानंतर दि. ३१ जुलै रोजी सकाळी १०.१५ वाजता तिरुपती येथून बंगळुरू-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाने परतीच्या प्रवासाला निघाले होते. कर्नाटकमधील चित्रदुर्ग जिल्ह्यातील हिरुर तालुक्यातील वडनली गावाजवळ क्रुझर जीपवरील (क्र. एम एच २७-एआर ८३१५) चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यावेळी ही गाडी दुभाजकाला जाऊन धडकली. या दुर्घटनेत राजू नारायण वानखेडे (३५), शंकर दत्त्तराव लोमटे (३७), सौ. सुरेखा शंकर लोमटे (३२, सर्व रा. डोंगरकडा) तिघांचा मृत्यू झाला.

क्रुझरचालकासह गजानन बालाजी वानखेडे (३२), सौ. कान्होपात्रा बालाजी वानखेडे (२७), सावित्री राजू वानखेडे (३२), अक्षय रमेश वानखेडे (१५), रूपाली अर्जुन वानखेडे (१), चालक अर्जुन शिवाजी वानखेडे (३०), कृष्णा बागल (१५) सर्व राहणार डोंगरकडा गंभीर जखमी झाले आहेत.

शिरूर पोलिस स्थानक येथील कर्मचा-यांनी सदरील जखमींना चित्रदुर्ग जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेची माहिती मिळताच संबंधित पोलिस स्थानकाचे पोलिस ई. आनंद, सहाय्यक पोलिस निरीक्षक आदम आणि शिपाई यांनी गुन्हा दाखल केला आहे. मृतांमध्ये शंकर लोमटे आणि त्यांची पत्नी रेखा या दोघांचा समावेश आहे. त्यामुळे लोमटे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या