21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeनांदेडअज्ञात वाहनाच्या धडकेत तीनजण जागीच ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत तीनजण जागीच ठार

एकमत ऑनलाईन

नांदेड : भरधाव वेगाने जाणा-या ऐका अज्ञात वाहनाने दुचाकीला धकड दिल्याने दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दि.१७ जून रोजी मध्यरात्री धनेगाव चौकात घडली. मागच्या चार दिवसापासुन जिल्ह्यात अपघाताचे सत्र सुरूच असुन दि.१७ जून रोजी लोहा तालुक्यातील मारतळा येथील तिघाजनांचा अपघाताने दुदैवी मृत्यू झाला आहे.

विनोद अनिल दर्शने (१९), लंकेश साहेबराव गवाले(२१) सतीश रामचंद्र देवकांबळे (२०) असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. हे तिघेजण दि. १७ जुनच्या मध्यरात्री दुचाकी क्रमांक एम एच २६ बी.टी.९८७५ वरून दुध डेअरीकडून वाजेगाव बायपास मार्गाकडे जात होते. दरम्यान मध्यरात्री ते तिघेजन नांदेड-नायगाव महामार्गावरील धनेगाव चौकात आले असता, चंदासिंग कॉर्नरकडून जुन्या पुलाकडे भरधाव वेगात जात असलेल्या एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. ज्यात दुचाकी वरील तिघेजन गंभीर जखमी झाले.

अपघात येवढा भयंकर होता की त्या तिघांचाही घटनास्थळीच जागीच मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड, पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल दुरपडे यासह पोलिस कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर घटनास्थळी दाखल होऊन पोलीसांनी अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या बाजूला सारुन काही काळा पुरती खोळंबलेली वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. दरम्यान यानंतर महामार्गाच्या रुग्णवाहिकेतून तिन्ही अपघातात मृत्यू पावलेल्या मयतांचे मृतदेह विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. या प्रकरणी दुपारपर्यंत कुठल्याही प्रकारची नोंद करण्यात आली नसल्याची माहिती ग्रामीण ठाण्याच्या पोलिसांनी दिली.

मारतळ्यात शोककळा
अपघातातील तिघेही मयत हे मारतळा ता. लोहा येथील रहिवासी असून गुरुवारी मध्यरात्री धनेगाव पाटीजवळ झालेल्या दुचाकी अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे मारतळा गावात शोककळा पसरली असुन शवविच्छदनानंतर शुक्रवारी सायंकाळी तिघांवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मुंबई-औरंगाबाद-नांदेड-हैद्राबाद बुलेट ट्रेन उभारा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या