26.9 C
Latur
Monday, June 14, 2021
Homeनांदेडजिल्ह्यात गुंडांचा थरार; गोळीबारात एक ठार

जिल्ह्यात गुंडांचा थरार; गोळीबारात एक ठार

एकमत ऑनलाईन

नांदेड : तत्कालीन पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी जिल्ह्यात होणा-या गोळीबारावर अंकुश बसवून व्यापा-यांसह नांदेडकरांना दिलासा दिला होता. त्यामुळे मुंबई, पुणे, हैदराबाद येथे वास्तव्यासाठी गेलेले व्यापारी पुन्हा एकदा नांदेड शहरात आले होते. त्यांच्या कारवाईमुळे व्यापा-यांना दिलासा मिळाला होता. परंतु गेल्या काही दिवसापासून पुन्हा एकदा लुटारू टोळीने डोके वर काढले असून शहरासह आता जिल्ह्यातही खुलेआम लूट होत असतांना पहावयास मिळत आहे. खून, गोळीबार, लुटमार बिनधास्तपणे होत असल्याचे नांदेडकरांना पहावयास मिळत आहे. यामुळे शहरात गुंडांची दहशत निर्माण झाली आहे.

दोन दिवसा अगोदर घडलेल्या घटनेनंतर सोमवारी सकाळी मुदखेड तालुक्यातील निवघा गावात एका तरुणावर गोळीबार करुन त्यास जखमी अवस्थेत मोटारसायकलवर नेवून इजळी शिवारात फेकून दिल्यानंतरत्याच्यावर आणखी दोन गोळ्या झाडून तलवारीने हल्ला करुन ठार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात गुंडांचा थरार निर्माण झाला आहे. पोलिस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी वेळीच अंकुश बसविला नाही तर जिल्ह्यात रिंघा गँग सक्रिय होण्यास वेळ लागणार नाही असे भाकित केले जात आहे.

या घटनेची माहिती अशी की,निवघा तालुका मुदखेड येथील देविदास मारोती पवार वय ३४ वर्ष या तरूणाचे सोमवार दि.१७ रोजी सकाळी अकराच्या सुमारास अपहरण करण्यात आले.यानंतर दोन्ही अज्ञात आरोपींनी निवघ्या जवळील इजळी शिवारात त्यांच्यावर गोळ्या झाडून खुन केला.या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक तुगावे यांनी आपल्या सहका-यासह घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान मयत तरूणाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी विष्णूपुरी येथील शासकिय रुग्णालयात पाठविण्यात आला. दरम्यान दुपारी ३.३० च्या दरम्यान पोलिस अधिका-यांची टिम घटनास्थळी दाखल झाली होती. सदर तरूणाचा पैसाच्या देवान घेवानीवरुन खुन झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

जिल्ह्यातील गुन्हेगारीवर पोलिसांची वचक राहिली नसल्यामुळे अनेक ठिकाणी दिवसा ढवळ्या गोळीबार होत आहे. बारड परिसरात यापुर्वी देखील एका इसमाचा तिक्ष्न हत्याराने गळा चिरडून खुन केला होता. निवघा येथील मयत देविदास पवार हा येथील हनुमान मंदिर परिसारत थांबला असता. सोमवारी सकाळी अज्ञात दोघेजण दुचाकीवर आले व देविदास यास सोबत घेवून इजळी शिवारात नेले. तेथे गोळ्या झाडून देविदासचा खुन केला.यानंतर मृतदेह काही अंतरावर नेवून झुडपात फे कुन देण्यात आला. ही घटना काही नागरीकांनी पाहिल्यानंतर बघीतल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिस ठाण्यात माहिती दिली.यामुळे खुनाचा हा गंभीर प्रकार उजेडात आला.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.याप्रकरणी बारड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रीया सुरु होती.

आधी गोळी नंतर तलवारीने वार
मुदखेड तालुक्यातील निवघा येथील देविदास उर्फ गुरू माधवराव पवार हा गावातील शिवाजी पुतळा परिसरात असतांना दुचाकीवर आलेल्या तीन अज्ञात मारेक-यांनी देविदासवर गोळी झाडली. त्यानंतर जखमी अवस्थेत सदर तरूणास मोटार सायकलवर इजळी शिवारात घेवून गेल्यानंतर त्या ठिकाणी दोन गोळ्या झाडून तलवारीने वार केले. यात देविदास पवारचा घटनास्थळी मृत्यु झाला. त्यानंतर आरोपी फरार झाले. सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर बारड व मुदखेड पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी सुध्दा घटनास्थळाला भेट दिली .

शास्त्रीय आधार की तुटवडा?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या