देगलूर : कोरोनामुळे मार्चपासून देगलूर शहरातील व्यवसायाची मोडलेली घडी अद्याप बसली नसून आता दुकान मालक आणि भाडेकरू मध्ये भाड्याच्या देवाणघेवाणीवरुण वाद व्हायला लागले आहेत. शेकडो दुकानदारांना भाड्याची चिंता दिनरात्र सतावत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गत सहा महिन्यांपासून सर्वच व्यवहार ठप्प आहेत. त्यातच दुकान भाड्यासाठी काही दुकान मालकांचा तगादा सुरू आहे. तर काहींनी सहानुभूती दाखवत दुकानाच्या भाड्यासाठी काही दिवसासाठी सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. करुणा मुळे छोट्या-छोट्या व्यावसायिकावर उपासमारीची वेळ आली आहे. अनेकांचे व्यवसाय आर्थिक डबघाईला आले आहेत. देगलूर तालुक्यातील विविध गावासह शेजारच्या तेलंगणा व कर्नाटक सीमाभागातील अनेक व्यवसायिकांनी व्यवसाय करण्यासाठी देगलूर शहरांमध्ये घर भाड्याने व दुकान भाड्याने घेऊन व्यवसाय करत आहेत.
मात्र या व्यवसायिकांच्या या सहा महिन्याच्या कालावधीत टाळेबंदीतच गेला. या दुकानदारांना दुकान मालकाकडून सध्याला व्यावसायिकांना तगादा भाड्यासाठी लावला जात आहे. व्यवसायात लाखो रुपयांचे भांडवल गुंतविले आहे. अशात कोरोनामुळे सुरू झालेल्या टाळेबंदी मुळे सर्वच व्यवहार अडचणीत आले आहेत.
आता टप्प्याटप्प्याने प्रशासनाकडून सर्व व्यवहार सुरू करण्यासाठी परवानगी दिली जात आहे .व्यवहार सुरू झाले आहेत. मात्र अद्यापही विस्कटलेली घडी बसली नाही. अशातच भाड्यासाठी दुकान मालकाकडून तगादा लावला जात आहे. परिणामी छोटे छोटे व्यावसायिक आर्थिक कोंडीत अडकले आहेत.
यंदा केवळ चारच महिने व्यवसाय
गत दिवाळीनंतर जेमतेम तीन ते चार महिने व्यवसाय झाला. त्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चअखेर लॉकडॉनचा दुकानांना टाळे लागला.तेव्हापासून अद्यापही व्यवसायिकांची विस्कटलेली घडी बसलीच नाही. भांडवलात अडकलेला पैसा, मालाची घटलेली आवक, कंपन्यांकडून होणा-या पुरवठ्याचा तुटवडा, विक्रीत आलेली तूट यासह विविध कारणाने व्यवसाय अडचणीत आले आहेत. येत्या दोन ते अडीच महिन्यावर दिवाळी आहे. दुकान भांडे कसे निघणार ? हाच प्रश्न व्यावसायिकांना सतावत आहे.
आर्थिक नियोजन कोलमडले
मी छोटा व्यावसायिक आहे देगलूर शहरात हॉटेलचा व्यवसाय करतो. ८० हजार रुपये वार्षिक भाडे माज्या हॉटेलला आहे. गत सहा महिन्यांपासून माझा व्यवसाय पूर्णत: बंद आहे. मग दुकान भांडे कसे भरायचे? हाच सवाल माज्यासमोर उभा टाकला असून ही चिंता मला आता भेडसावत आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा भागवायचा ? याचीही चिंता लागली आहे. कोरोनामुळे माज्यासारख्या अनेकांचे व्यवसाय फार मोडीत निघाले आहेत असे रमेश लष्करे म्हणाले.