ध्येय प्राप्तीसाठी स्वत:तील राजहंसाचा शोध घ्यावा

358

नांदेड :दुर्दम्य इच्छाशक्ती व कठोर परिश्रमाशिवाय ध्येयप्राप्ती शक्य नाही. विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन करून स्वत:तील राजहंसाचा शोध घ्यावा म्हणजे यश हमखास मिळेल. वडाळा मुंबईच्या चाळीत राहणारा मी मुलगा – माज्या बापाच्या शिक्षणाच्या दुर्दम्य इच्छाशक्तीमुळेच प्रगतीचे शिखर गाठू शकलो असे प्रतिपादन खासदार डॉ. नरेंद्र जाधव यांनी पीपल्स महाविद्यालयात आयोजित वेबिनार मध्ये बोलताना केले.

पीपल्स महाविद्यालयात बदलत्या जगाच्या नव्या दिशा या उपक्रमातर्गत मी असा घडलो हा अनुभवकथनाचा आॅनलाईन कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. आर. एम. जाधव यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय संयोजक डॉ. डी. एन. मोरे यांनी करून दिला.

माझा बाप हाच ख-या अर्थाने माझ्या यशाचा पाया व शिखर आहे. चाळीत राहणाºया माझ्या सारख्या विद्यार्थ्यांची महत्वकांक्षा तेथील परिस्थितीनुरूप दादा बनण्याची होती. पुढे वडिलांनी शिक्षणाची संधी दिल्यामुळे मी विकसित झालो. पुढे निदान सेवकाची तरी नौकरी मिळावी असे वाटू लागले. त्यानंतर शिक्षक व्हावे, प्राध्यापक व्हावे अशी महत्वकांक्षा वाढत गेली. त्यामधूनच मी ध्येयप्राप्तीसाठी प्रयत्न करत गेलो आणि यशाला गवसणी घातली.

आमचा बाप आन आम्हीच्या २०१ आवृत्या प्रसिद्ध झाल्या. हा जागतिक उच्चांक आहे. सात लाख प्रतीचा खप झाला. ७० पुरस्कार मिळाले. कुलगुरू, खासदार झालो. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी मिळाली. हे सर्व कठीण परिश्रम केल्यामुळेच शक्य झाले.

स्वत:चा शोध घ्या, मोठे ध्येय, कठोर परिश्रम, दुर्दम्य इच्छाशक्ती, वेळेचे नियोजन करणे आवश्यक आहे़ कोणत्याही क्षेत्रात यश मिळाले तर सामाजिक बांधिलकीचे भान ठेवावे मानसिकता सकारात्मक ठेवावी़समाजाचे काही देणे आहोत ही भावना ठेवून मातृभूमी व आई वडिलांचा आदर करावा असा मूलमंत्रही त्यांनी दिला. जीवनात यशश्वी होण्यासाठी नऊ सूत्रीचा अंमल करण्याचे आवाहन केले . स्वत:चा शोध घ्या, मोठे ध्येय, कठोर परिश्रम, दुर्दम्य इच्छाशक्ती, वेळेचे नियोजन करावे,
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य डॉ. अशोक सिद्धेवाड यांनी केले तर डॉ. विशाल पतंगे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशश्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ. बी. डी. कोमपलवार, डॉ. पंढरी गड्डपवार, राहुल गवारे, प्रा. गणेश खपराळे आदींनी परिश्रम घेतले.

Read More  जिंतूर-परभणी राष्ट्रीय महामार्ग बनला घसरगुंडी