27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeनांदेडकंधारमध्ये सर्व सोयींनी युक्त क्रीडांगण उभारणार - खा. चिखलीकर

कंधारमध्ये सर्व सोयींनी युक्त क्रीडांगण उभारणार – खा. चिखलीकर

एकमत ऑनलाईन

कंधार (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४२ कोटी रुपये दिल्यामुळे नांदेडमध्ये उच्चप्रतीचे स्टेडियम होऊ शकले. त्याच धर्तीवर कंधार येथे सर्वसोयींनी युक्त क्रीडांगण उभारण्यासाठी मी कटिबद्ध आहे. तसेच खेळाडूंच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करीत राहील, अशी ग्वाही खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली. ग्रामीण भागातील खेळाडूंना विविध स्पर्धांमुळे आपली कामगिरी दाखवण्याची संधी मिळते, असेही ते म्हणाले. .

कंधार येथील नवरंपुरा येथील क्रीडा संकुल मैदानात खा. प्रताप पाटील चिखलीकर व खा. सुधाकर श्रृंगारे यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या वतीने खासदार चषक खुल्या टेनिस बॉल ‘डे-नाईट’ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी बोलताना खा. चिखलीकर बोलत होते.

ही खासदार चषक क्रिकेट स्पर्धा १५ मे रोजी सुरू झाली होती. गुरुवारी (दि. २६) मध्यरात्री संपलेल्या अंतिम सामन्यात सरपंच ईलेव्हन बिजेवाडी क्रिकेट संघाने युवा मुंबई क्रिकेट संघाचा पराभव करत अंतिम विजेतेपद पटकाविले. दोन लाख रुपये रोख व ट्रॉफी देऊन या संघाचा सन्मान करण्यात आला.

या स्पर्धेत नांदेडसह मुंबई, नागपूर, निजामाबाद, लातुर, परभणी, बुलडाणा, अकोला, बोधन, जिंतूर आदी ठकाणचे ठिकाणचे एकूण ६४ संघ सहभागी झाले होते. द्वितीय पारितोषिक युवा मुंबई क्रिकेट क्लब मुंबई यांनी तर तृतीय पारितोषिक सेना ईलेव्हन मुखेड यांनी पटकावले. उत्कृष्ट झेल आदित्य ग्रुपवार मेडिमिक्स इलेव्हन पानभोसी, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक रमण आवाळे मैफिल बॉईज कंधार, उत्कृष्ट गोलंदाज फरहान सरपंच इलेव्हन बिजेवाडी, उत्कृष्ट फलंदाज मालिकावीर सामनावीर शहेबाज सरपंच इलेव्हन यांना बहुमान मिळाला.

यावेळी भाजपा महानगरचे जिल्हाध्यक्ष प्रवीण साले, मिस इंडिया सीमा कदम, जि.प. सदस्य प्रवीण पाटिल चिखलीकर, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अड किशोर देशमुख यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. ही स्पर्धा पाहण्यासाठी कंधार पंचक्रोशीतील क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या