भोकर/किनवट : गेल्या तेरा दिवसापासून कोरोना विषाणूला रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लावण्यात आली होती़ शुक्रवारी त्यात शिथीलता आणल्यानंतर जिल्ह्यातील भोकर, किनवट शहरासह जिल्ह्यातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती़ शनिवार, रविवारी बाजारपेठ बंद राहणार असून नागपंचमीचा सण आल्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर दिसुन आले़ कोरोनाची आता भितीच राहीली नाही, असे चित्र शुक्रवारी पाहावयास मिळाले.
भोकर : गेल्या दहा दिवसापासून असलेल्या संचारबंदीत आज सूट देण्यात आल्याने भोकर शहरात नागरिकांची तुफान गर्दी उसळली. सोशल डिस्टंसिंगचाही पूर्णपणे फज्जा उडाल्याचे दिसून आले.
भोकर येथील बाजारात तोबा गर्दी केली.ना सोशल डिस्टंसिंग ना तोंडाला मास्क. कोणत्याही व्यक्तींना कोरोना महामारीची भीती दिसून आलेली निदर्शनात आली नाही. उलट सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, मोटरसायकलवर ट्रिपल सीट फिरणे, तशेच अनेक दुकानात गर्दी करून माल खरेदी करताना चे चित्र शहरात सर्वत्र पाहायला मिळाले. मात्र या प्रकाराला आळा घालण्यासाठी कुठलीही शासकीय यंत्रणा कार्यरत असल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे करुणा रोगाचा प्रादुर्भाव जर वाढला तर तो निश्चित सर्वांच्या हाताच्या बाहेर जाईल अशी भीती सुज्ञ नागरिक व्यक्त करीत आहेत.
तेव्हा शासकीय यंत्रणेने शासनाच्या सर्व नियमाची काटेकोरपणे शहरात अंमलबजावणी करून गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे काम करावे व कोरोना महामारी पासून लोकांना दूर ठेवण्यासाठी कडक नियमाची अंमलबजावणी प्रशासनाने करावी अशी अपेक्षा शहरातील नागरिकांकडून व्यक्त होताना दिसून येत आहे.
किनवट : जिल्ह्यात १२ जुलै ते २३ जुलै पर्यंत लागु करण्यात आलेली संचारबंदी आज शिथिल झाल्या नंतर शहरात एकच गर्दी उसळली त्यामुळे सोशल डिस्टस्टींगचा फज्जा उडाला तर नागरीकांनी प्रत्येक ठीकाणी गर्दी केल्याचे निदर्शनास आले त्यामुळे नागरीकांना हा भान ही राहिला नाही कि या आधीच राज्यात ३१ जुलै पर्यंत लॉकडाउन घोषित करण्यात आलेला आहे त्यात काही अटी व शर्ती सह सकाळी ९ ते सांय ५ वाजे पर्यंत प्रतिष्ठाणे उघडी ठेवण्याची परवानगी आहे त्यात विविध दिशानिर्देश व अटीशतीर्चे पालन नागरीकांना करावयाचे आहे.
परंतु नांदेड जिल्ह्यात कोरोना संक्रमन व रुग्नाची संख्या झपाट्याने वाढल्याने जिल्हाधिका-यांनी १२ ते २३ जुलै संचारबंदी घोषित केली होती नागरीक सलग दोन आठवडे घरात असल्याने व शनिवारी नागपंचमी चा सण असल्याने व जिल्हाधिका-यांच्या सुधारीत आदेशा नुसार शनिवार व रविवार या दोन दिवशी बाजारपेठ बंद राहणार आहे त्यामुळे आज शुक्रवारी उसळलेली गर्दी ही प्रचंड होती यात एकादा व्यक्ती जरी संक्रमित झाला तर अनेकांना यातुन संक्रमन होऊ शकतो याची प्रशासनाने दखल घ्यायला पाहिजे होती अशी अपेक्षा आरोग्य प्रेमी नागरीकांनी व्यक्त केली तर किनवट तालुक्यातील बोधडी, सारखणी, मांडवी, शिवणी, इस्लापुरसह शहरातील बॅकां मध्ये, बाजारपेठामध्ये प्रचंड गर्दी उसळली होती त्यामुळे नागरीकाना अनेक त्रास सहन करावा लागला.
Read More हिमायतनगर : गल्ली बोळात सौर उर्जेच्या दिव्यानी केला लखलखाट