24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeनांदेडलग्नाचे अमिष दाखवुन मुलीवर अत्याचार

लग्नाचे अमिष दाखवुन मुलीवर अत्याचार

एकमत ऑनलाईन

वाईबाजार : वाई बाजार येथून जवळच असलेल्या पळसा येथील इमरान नवाब शेख वय २६ या तरुणाने मुलीला लग्नाचे आमिष देऊन अत्याचार केल्याची घटना पळसा या ठिकाणी घडली आहे.

पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून सिंदखेड ठाण्यात इमरान नवाब शेख याच्याविरुद्ध लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला असून सिंदखेड पोलिसांनी इमरान नवाब शेख याला अटक केली आहे.

इम्रान शेख हे मागील अनेक दिवसापासून पळसा येथीलच राहणा्न्या एका २२ वर्षीय मुलीला लग्नाचे खोटे आमिष देऊन त्या मुलीचे शोषण करून अत्याचार करत होता मुलीने लग्न संदर्भात विचारले असता तो मुलीला वेळ काढण्यासाठी तात्पुरते खोटे आश्वासन देत असल्याचे मुलीच्या लक्षात आले नेहमीच्या आश्वासनाला कंटाळून मुलीने शेवटी इमरान याच्याविरुद्ध सिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला असून पोलिसांनी आरोपी इम्रान शेख याला अटक केली आहे.

Read More  उमरी तालुक्यात आत्तापर्यंत १४ कोरोना पॉझिटीव्ह

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या