वाई बाजार : येथे दिवसोदिंवस कोरोणा बाधीत रूग्णाच्या संख्येत भर पडत असून अँन्टिजन टेस्ट नुसार वाईत रूग्णाची संख्या 16 झाली असून त्यापैकी बारा रूग्ण निगेटिव्ह आले आहे. गावात कोरोणाचा फैलाव वाई येथील व्यापा-यातून झाल्या असल्याचा तपास वाई येथील प्राथमिक आरोग्य केन्द्राचे वैधकिय अधिकारी डाँ.होलसुरे यांनी तयार केलेल्या अहवाला नुसार समोर आला आहे. यामुळे व्यापारी वर्गात कोरोणा अजारा विषयी भीतीचे वातावरण निर्माण होऊन एकच खळबळ ऊडाली आहे.
वाईत कोरोणाची वाढता प्रादुर्भाव लक्ष्यात घेता वाई ग्रा.पंचायत व व्यापारी संघटनेच्या सयुंक्त विद्यमानाणी आज वाई ग्रा.पंचायतीत सोशल डिस्टंन्स ठेऊन छोटेखानी बैठकीचे आयोजन करन्यात आले होते. या बैठकीत कोरोणावर प्रतिबंध लावन्यासाठी या आठवड्यात गावातील तिन दिवस दुकाने कळडीत बंद ठेऊन जनता कर्फ्यु लावन्याचा निर्णय घेन्यात आला.जे कोणी नियमाचे ऊलंघन करेल त्याच्यावर दंडात्मक कार्यवाहि करन्यात येणार असल्याचे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अनिल रूणवाल यांनी म्हटले आहे.ते पुढे म्हणाले गावात कोरोणाचा पहिला शिरकाव हे गावातील व्यापा-या कडून झाला असल्याचा अहवाल अरोग्य विभागाने त्यांच्या वरिष्ठाना पाठवला आहे.
त्या अनुशंगाने व्यापा-यांनी सावधगीरी बाळगणे स्व:तची काळजी घेऊन कोरोणा अन्टिजन टेस्ट करन्याचे अवहान व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अनिल रुणवाल यांनी केले होते परंतू गावात कोरोणाचा फैलाव व्यापारी वगार्तूनच झाल्याने गावातील व्यापारी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले असून अध्येक्षानी सुचविलेल्या अन्टिजन टेस्टला व्यापा-यानी विरोध दर्शविला आहे.
सीरम इन्स्टिट्यूटने कोरोनाची चाचणी थांबविली