25.2 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeनांदेडशामनगर रस्त्यावर वाहतुक कोंडी बनली डोकेदुखी

शामनगर रस्त्यावर वाहतुक कोंडी बनली डोकेदुखी

एकमत ऑनलाईन

नांदेड : शहरातील शैक्षणिक संकुलाचे हब म्हणून ओळख झालेल्या कैÞ शंकरराव चव्हाण ते शामनगर- भाग्यनगर रस्त्यावर रोजच होणारी वाहतुक कोंडी नागरिकांची डोकेदुखी बनली आहेÞ तर या भागात असलेल्या मनपाच्या रूग्णालयात ये-जा करणेही जीवघेणे ठरत आहे. नांदेड शहर गेल्या काही वर्षात शैक्षणिक हब म्हणून ओळखले जात आहे

यामुळे नांदेडसह लातूर, परभणी, हिंगोली आणि विर्दभातून शेकडो विद्यार्थी येथे शिक्षण घेण्यासाठी येत आहेतÞ शाळा, महाविद्यालयासह अनेक नामवंत आणि छोटया, मोठ्या कोंचिग क्लासेस चालकांनी आपले बस्तान कैÞ शंकरराव चव्हाण पुतळा ते बाबानगर, शामनगर, भाग्यानग, आनंद नगर या भागातील मुख्य रस्त्यालगतच मांडले आहेÞ टोलेजंग इमारती क्लासेससाठी बांधण्यात आल्या आहेत मात्र अनेक ठिकाणी विद्यार्थी रस्ते आणि नागरिकांसाठी असलेल्या फुटपाथांवरच वाहने लावित आहेतÞ याचा वाहतुकीस अडथळा होत आहेÞ तर क्लासेस सुटताच या रस्त्यावर जत्रा भरल्यासारखी गर्दी होत आहेÞ

यामुळे दररोजच सकाळ, दुपार व संध्याकाळच्या वेळेत मोठया प्रमाणात वाहतुक कोंडी होत आहेÞ यात सर्वसामान्य नागरिकांसह वाहनधारकांना अडकून पडावे लागत आहेÞ याच रस्त्यावर शामनगर येथे महापालिकेचे नवजात शिशु आणि स्त्री रूग्णालय आहे, शहरातील विविध भागातून अनेक रूग्ण या रूग्णालयात उपचारासाठी येत असतातÞ परंतू तातडीने उपचार आवश्यक असणार रूग्ण सुद्धा कोंडीत सापडत आहेतÞ काहीवेळा रूग्णवाहिका ही अडकुन पडत आहेतÞ अनेकवेळा वाहतुकीची कोंडी सुटण्यासाठी अर्धा ते एक तास वेळ जात आहेÞ येथे वाहतुक शाखेचे कोणतेही नियंत्रण आणि अथवा कर्मचारीही नियुक्त केला जात नाहीÞ यामुळे अधिकचा त्रास सहन करावा लागत आहेÞ

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या