21.9 C
Latur
Thursday, September 23, 2021
Homeनांदेडहिमायतनगर महामार्गावरील अर्धवट कामामुळे वाहतूक ठप्प

हिमायतनगर महामार्गावरील अर्धवट कामामुळे वाहतूक ठप्प

एकमत ऑनलाईन

हिमायतनगर : राष्ट्रीय महामार्गामधील पुलाचे काम ठेकेदाराने अर्धवट ठेवल्यामुळे प्रवाशी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, काल झालेल्या मुसळधार पावसाने पर्यायी पूल वाहून गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. तर या ठिकाणी ट्रक फसल्याने प्रवाश्याना मोठी कसरत करत मार्ग काढावा लागत आहे. त्यामुळे तात्पुरता पर्यायी पूल दुरुस्त करून नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी शिवसेना उपतालुकाप्रमुख विलास वानखेडे यांनी वरिष्ठ अधिकारी व सबंधित गुत्तेदारास केली आहे.

गुरूवारी हिमायतनगर शहरासह तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेकांचे शेतीचे होत्याचे नव्हते झाले. त्याचाच फटका राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या अर्धवट पुलाच्या अबाजूबाजूच्या लोकांना बसला असून, अनेकांची शेती वाहून गेली आहे. तर पयार्यी पूल वाहून गेल्याने शहरात येणारा मुख्य मार्ग बंद पडला आहे. हिमायतनगर शहरा नजिक रखडलेल्या अर्धवट पुलामुळे पुराच्या पाण्याने येथील पयार्यी पूल खचला आहे. त्यामुळे येथून प्रवास करणा-या वाहनधारकांना मोठ्या जिकरीचे प्रवास करावा लागतो आहे. अनेकांना तर दुचाक्या ढकलून मार्ग काढावा लागत आहे. काहीजणांची तर अक्षरशा घसररगुंडी झाली असून, ठेकेदाराच्या नावाने बोटे मोडण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

खरे पाहत पावसापूर्वी ठेकेदारने संबंधित पुलाचे कामे पूर्ण करून वाहनधारक प्रवाशांची होणारी अडचण दूर करावी याची काळजी घेणे गरजेचे होते. मात्र याकडे त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे आज हि परिस्थिती उद्भवली आहे. पावसाळा सुरु झाल्यापासुन दुस-यादा या ठिकाणी वाहनधारकांना हैराण व्हावे लागत आहे. आगामी पावसाळ्याच्या दिवसात पुन्हा हि परिस्थिती उद्भवू नये म्हणून तातडीने या पुलाचे अर्धवट काम पूर्ण करून ठेकेदाराने नागरिकांची होणारी हेळसांड तात्काळ थांबवावी अशी मागणी हिमायतनगर शिवसेना उपतालुकाप्रमुख विलास वानखेडेव यांनी केली आहे.

वाहतूक ५ तास ठप्प
शहरातुन जाणा-या राष्ट्रीय महामार्ग १६१ चे काम मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. त्या रस्त्यावरील नाल्याचे बांधकाम सबंधित गुप्तेदाराने अर्धवट केल्यामूळे गुरुवारी झालेल्या पावसाच्या पाण्यामुळे तेथील पुलाच्या बाजूने असलेल्या पर्यायी रस्त्यावर एक सागवान घेऊन जाणारा ट्रक अडकल्यामुळे येथील वाहतूक ५ तास ठप्प झाली आहे. त्यामुळे माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड,काँग्रेस कार्यकर्ते कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक रफीक सेठ, विलास वानखेडे, प्रकाश रामदिनवार सह आदी कार्यकर्ते व पत्रकारांनी संबंधीत अधिका-यांशी संपर्क साधून वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदत केली.

देशात ३५ हजार ३४२ नवे रुग्ण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या