36.1 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeनांदेडनांदेडमध्ये ७२२ पोलिस कर्मचा-यांच्या बदल्या

नांदेडमध्ये ७२२ पोलिस कर्मचा-यांच्या बदल्या

एकमत ऑनलाईन

नांदेड : जिल्ह्यातील बदलीपात्र पोलिस कर्मचा-यांना प्रत्यक्ष बोलावून समक्ष मुलाखती घेत जिल्हा पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी त्यांच्या बदल्या केल्या आहेत. संबंधित पोलिस कर्मचा-यांच्या मनाप्रमाणे बदल्या केल्यास ते अधिक कार्यक्षमतेने काम करतील, असा विश्वास शेवाळे यांना आहे. त्यामुळे त्यांनी बदलीपात्र पोलिस उपनिरीक्षक, पोलिस हेडकॉन्स्टेबल, नाईक पोलिस शिपाई, पोलिस शिपाई, चालक पोलिस शिपाई अशा एकूण ७२२ जणांच्या बदल्या केल्या आहेत.

दि. ३१ मे २०२० पर्यंत कालावधी पूर्ण केलेल्या बदलीपात्र पोलिस कर्मचा-यांना पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी रविवार दि. २७ सप्टेंबर रोजी येथील आशना रेस्ट हाऊस, पोलिस मुख्यालय येथे बोलावून घेतले आणि त्यांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. या कर्मचा-यांना हजर राहण्यासाठी वेगवेगळी वेळ देण्यात आली होती. त्यात सहायक पोलिस उपनिरीक्षक यांना सकाळी ९ ते ११, पोलिस हेडकॉन्स्टेबल याां सकाळी ११ ते दुपारी २, नाईक पोलिस शिपाई, पोलिस शिपाई आणि चालक पोलिस शिपाई यांना दुपारी ३ च्या पुढे वेळ देण्यात आला होता.

या बदलीपात्र पोलिस कर्मचा-यांच्या मुलाखती पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार आणि पोलिस उपअधीक्षक (गृह) सिद्धेश्वर धुमाळ यांनी घेतल्या आणि त्यांच्याशी सुसंवाद साधून अडीअडचणीही जाणून घेतल्या आणि इच्छित ठिकाणी त्यांच्या बदल्या करण्यात आल्याने कर्मचा-यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

…चर्चा तर होणारच !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
167FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या