23.2 C
Latur
Saturday, September 25, 2021
Homeनांदेडपालकमंत्र्यांना विश्वासात न घेताच आयुक्तांची बदली

पालकमंत्र्यांना विश्वासात न घेताच आयुक्तांची बदली

एकमत ऑनलाईन

नांदेड : दोन दिवसापुर्वी मंत्रालयातून आयएएस झालेल्या पदोन्नतीतून सनदी अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या. सामान्य प्रशासन विभागात नांदेड मनपा आयुक्तांची जागा रिक्त असल्याचे दर्शविण्यात आल्यामुळे नांदेड वाघाळा महापालिकेच्या आयुक्तपदी एन.आर. गटणे यांची नियुक्ती करण्यात आली. यासंदर्भात नांदेडच्या पालकमंत्र्यांना कुठेही विश्वासात न घेता मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाने हे आदेश काढल्यामुळे यदाकदाचित गटणे यांची बदली रदद होऊ न डॉ. सुनील लहाने हेच आयुक्तपदी कायम राहतील अशी शक्यता मंत्रालयातील अनेक सनदी अधिका-यातून व्यक्त होत आहे.

महापालिकेचे विध्यमान आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी ७ एप्रिल २0२0 रोजी आयुक्त पदाचा पदभार ऐन कोरोना काळात स्वीकारला. या काळात त्यांनी आपल्या कामाची चुनूक दाखवत कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे त्यावेळेस संपूर्ण राज्यात नांदेड जिल्हा कोरोनात ग्रीनझोन म्हणून जाहिर करण्यात आला होता. यासंदर्भात दस्तुरखुद पालकमंत्र्यांनी देखील लहानेंचे तोंडभरुन कौतुक केले होते. कोरोना आटोक्यात येत असतांनाच आता कुठे लहाने यांनी प्रशासकीय आणि विकास कामाला सुरुवात केली होती. दिवाळीपर्यंत शहरातील नागरिकांना दररोज पाणीपुरवठा कसा होईल यासाठी निवीदा काढून नवीन विद्युत मोटारी आणण्याचा निर्णय घेतला. अनेक बड्या थकबाकीदारांकडून मोहिमेत थकीत मालमत्ता कर वसूल करण्यास सुरुवात केली होती.

यामुळे लहाने यांची बदली होणार नाही अशी शक्यता वर्तवली जात असतांनाच मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागातून नुकत्याच आयएएस झालेल्या अधिका-यांच्या बदल्यांचे आदेश निघाले. लहाने हे नगरविकास विभागातून आल्यामुळे त्यांच्या ठिकाणी सामान्य प्रशासन विभागातील अधिकारी नियुक्त करण्यात आला असला तरी यासंदर्भात जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना विश्वासात घेतले नसल्याचे समोर आले आहे. यामुळे डॉ. लहाने यांची बदली रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गेल्या सव्वा वर्षापासून पालकमंत्र्यांचे विश्वासू अधिकारी म्हणून डॉ. लहाने यांची ओळख झाली आहे. कुठलाही निर्णय घेण्यापुर्वी पालकमंत्र्यांना विश्वासात घेवून लहाने निर्णय घेत होते. त्याच प्रमाणे महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक, अनेक अधिकारी, कर्मचा-यांनाही त्यांनी विश्वासात घेत कामाला सुरुवात केली होती. अतिरिक्त आयुक्त मनोहरे यांच्याकडे देखील त्यांनी अनेक जबाबदा-या देत महापालिकेचे कामकाज चांगले व्हावे यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. यातच त्यांच्या या अचानक झालेल्या बदलीची चर्चा रंगली आहे. तत्कालीन आयुक्त गणेश देशमुख यांची देखील केवळ दहा महिन्यातच बदली करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा आयएएस असलेले माळी यांची बदली एका वर्षाच्या आतच झाली आहे. मनपा आयुक्तांच्या बदल्या वर्षेभराच्या आत होत असल्यामुळे नांदेडच्या विकासाला खिळ बसत आहे. यासाठी दस्तूरखुद पालकमंत्र्यांनी याकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे.

भाजप वोट बँकेच्या राजकारणाला घाबरत नाही

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या