23.8 C
Latur
Saturday, September 25, 2021
Homeनांदेडजिल्हा परिषदेत उद्यापासून बदल्यांचा हंगाम

जिल्हा परिषदेत उद्यापासून बदल्यांचा हंगाम

एकमत ऑनलाईन

नांदेड : शासन निर्णयातील तरतुदीनुसार जिल्हा परिषदेमधील गट -क (वर्ग-३), व गट- ड (वर्ग-४) च्या कर्मचा-यांच्या बदल्या करण्या संदर्भात निर्देश प्राप्त झाले असून,उद्या सोमवार दि.२६ जुलैपासून जिल्हास्तरीय बदल्या समुपदेशनाच्या वेळापत्रकानुसार नांदेड जिल्हा परिषदेत पार पडणार आहेत.यामुळे कर्मचा-यांची धाकधुक वाढली आहे.

सद्यस्थितीत राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला नसल्याने तसेच तिस-या लाटेची शक्यता लक्षात घेऊन सन २०२०-२१ या चालू आर्थिक वर्षी जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत गट -क (वर्ग-३), व गट-ड (वर्ग-४) च्या कर्मचा-यांच्या सार्वत्रिक बदल्या समुपदेशनाद्वारे करवण्याचे ठरविण्यात आले असून, याबाबत सदरील वेळापत्रकप्रमाणे आपल्या अधिनस्त संवर्गत काम करणा-या कर्मचा-यांच्या बदल्या करण्यात येणार आहेत.

ज्यात पहिल्या टप्प्यात महिला व बाल कल्याण विभातील कर्मचा-यांच्या बदल्या संदर्भात उद्या दि.२६ जुलै रोजी समुपदेशनातून सकाळी १० ते १२ वाजे पर्यंत बदली प्रक्रिया चालणार आहे. तर याच दिवशी बांधकाम विभागाचे सकाळी १२ ते १, लघुपाटबंधारे विभागाचे दुपारी १ ते २ , ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे दु.३ ते ४, कृषी विभागाचे ४ ते पाच तर पशु संवर्धन विभागाच्या ५ वा. ते बदली प्रक्रिया संपेपर्यंत या दरम्यान बदल्यांची प्रक्रिया सदरील वेळेनुसार संपन्न होणार आहे. तर दुस-या दिवशी दि.२७ जुलै रोजी आरोग्य विभागाच्या बदल्या संदर्भात सकाळी १० ते बदली प्रक्रिया संपेपर्यंत काम चालणार आहे.

तिस-या दिवशी समुपदेशन दि.२८ जुलै रोजी ग्रामपंचायत विभागाच्या बदल्या सकाळी १० वाजल्यापासून ते बदली प्रक्रिया संपेपर्यंत काम सुरू राहणार आहे. तर चौथ्या दिवशी समुपदेशन दि.३० जुलै रोजी अर्थ विभागाचे सकाळी १० ते दु.१ वाजेपर्यंत, शिक्षण विभाग (प्राथमिक वगळून) दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत तर सामान्य प्रशासन विभागाच्या बदल्या दुपारी ३ वाजेपासून ते बदली प्रक्रिया संपेपर्यंत बदल्यांचे समुपदेश प्रक्रिया चालणार आहे.

या बदली प्रक्रिया दरम्यान बदलीपात्र उमेदवारांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करावयाचे आहे. या वेळेत जिल्हा परिषद परिसरात बदलीपात्र उमेदवारांच्या व्यतिरिक्त इतर व्यक्तीला येण्यास प्रतिबंध असेल. तसे आढळून आल्यास संबंधीताविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. यावेळी कर्मचा-यांनी वास्तव जेष्टता यादी, विनंती अर्ज यादी, रिक्त पदाचा आणि संभाव्य पदाचा संवर्गनिहाय अहवाल अद्यावत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या जिल्हा परिषद अंतर्गत कर्मचारी सार्वत्रिक बदल्यांचे समुपदेशनाचे वेळापत्रक जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांच्या स्वाक्षरीने परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे.

लातुरात ओबीसी आरक्षणासाठी सर्वपक्षीयांची वज्रमुठ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या