कंधार (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकाचा फार मोठा सहभाग असतो. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी जिल्हा परिषद नवरंगपुरा येथील उपक्रमशील शिक्षक युसूफ शेख व स्वाती मुंडे हे नेहमीच प्रयत्नशील असतात. युसूफ शेख आंबुलगेकर लिखित संक्षेपाचा खजिना पुस्तक स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त आहे, असे प्रपिादन खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले आहे.
नवरंगपुरा येथे खासदार क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात नवरंगपुरा शाळेचे मुख्याध्यापक युसूफ शेख आंबुलगेकर यांच्या संक्षेपाचा खजिना या पुस्तकाचे प्रकाशन नांदेडचे खा.प्रताप पाटील चिखलीकर व लातुरचे खा.सुधाकर श्रृंगारे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला. या वेळी खा.प्रतापराव म्हणाले संक्षेपाचा खजिना हे पुस्तक विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेच्या दृष्टिकोनातून उपयुक्त आहे. याचा अभ्यास सर्वांनी करावा. लातुरचे खा.सुधाकर श्रृंगारे या वेळी म्हणाले की, शिक्षकांनी साहित्य कला जिवंत ठेवली पाहिजे व विद्यार्थ्यांत साहित्य कला निर्माण केली पाहिजे.
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष आनंदराव श्ािंदे ,भाजपचे कंधार तालुकाध्यक्ष भगवान राठोड, शहराध्यक्ष गंगाप्रसाद यन्नावार, लोहा न.पा.चे उपनगराध्यक्ष दत्ता वाले, कंधार न.पा.चे माजी उपनगराध्यक्ष जफरोदीन बाहोदीन, माजी नगरसेवक कृष्णा पापीनवार, प्राचार्य किशन डफडे,भाजप शिक्षक आघाडीचे तालुकाध्यक्ष राजहंस शहापुरे,भाजपचे सरचिटणिस मधुकर डांगे, चेतन केंद्रे ,मुख्याध्यापक शंतनू कैलासे, समीर चाऊस. युवा प्रमुख रजत शहापुरे, महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष गंगाधर मंगनाळे, जिल्हा उपाध्यक्ष दत्ता मुंडे, पांचाळी पतसंस्थेचे संचालक मोमिन जलिल, शिक्षक परिषदचे कैलास गरुडकर, तालुकाध्यक्ष मोबिन शेख आदी उपस्थित होते.