24.6 C
Latur
Sunday, October 24, 2021
Homeनांदेडहदगाव तालुक्यात वृक्षांची कत्तल

हदगाव तालुक्यात वृक्षांची कत्तल

एकमत ऑनलाईन

हदगाव : तालुक्यातील पुन्हा एकदा वृक्ष तोड होत आहे याकडे मात्र वनपाल यांचे आर्थिक लालसेपोटी साफ दुर्लक्ष होत आहे तालुक्यात वनपाल वनपरिक्षेत्रात वन पाल बेदरकर असताना वृक्ष तोडीला आळा बसला होता परंतु हदगाव वनपरिक्षेत्रास तीन महिन्यापासून नवीन आलेले वन पाल आल्या पासून पुन्हा एकदा वृक्ष तोड जोमाने होत आहे.

तसेच तालुक्यातील तामसा, लोहा बीट अंतर्गत होत असलेली अवैध वृक्षतोड वनपाल यांच्या मूक संमतीने होत आहे अशी तक्रार शेख अतीक यांनी दि.२३ जून रोजी केली आहे दिलेल्या तक्रारीत त्याने असे म्हटले आहे हदगाव येथील वनपाल सुट्टीच्या दिवशीच हदगाव येथे उपस्थित का राहतात असे ही निवेदनात म्हटले आहे.

सतत वादाच्या भोव-्यात राहणारे वनपरिक्षेत्र कार्यालय हदगाव येथील वनपाल यांचा प्रताप उजेडात येत आहे. वृक्ष संवर्धन व संगोपन करणे हे शासनाचे जबाबदार कर्मचा-यांचे कर्तव्य आहे. पण इथल्या वनपाल यांची शासनाच्या नियमाच्या विरोधी भूमिका असून त्यांच्याच संगनमताने निसगार्तील अवैध वृक्षतोड हदगाव बीट, तामसा बीट, लोहा बीट या क्षेत्रातून होत आहेत. अनमोल असे वनस्पतीची मोठ्या प्रमाणात कटाई होत असून जमीन ओसाड होत आहे. उपरोक्त बीटमध्ये जुने चाळीस ते पन्नास वर्षांचे मोठे झाडे संपूर्ण नष्ट झालेले दिसत आहेत. ते झाड कुठे गेले त्यांना तोडण्याची परवानगी दिली गेली होती काय? असे झाड तोडून वनपाल यांच्या सहमतीने ट्रक भरून हैदराबादला जात आहेत.

सदरील गाड्या आपल्या कार्यालया समोरून जातात पण त्यांच्यावर कुठलीच कारवाई होत नाही तसेच लाकूड भरून जाणा-्या गाड्या विषयी वनपाल यांना माहिती देण्यासाठी फोन केला असता फोन कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर असतो. कार्यालयात सतत गैरहजर असतात तरी उपरोक्त बिटातील होणारी अवैध वृक्षतोड तात्काळ थांबून निसगार्तील अनमोल वनस्पतींचे रक्षण करावे.व वृक्ष तोडी मागे हदगाव येथे आलेल्या नवीन वनपाल यांचा समावेश आहे अश्या प्रकारचे निवेदन त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी यांना दिले आहे

९६ खासदारांनी अद्यापही घेतली नाही लस

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या