हदगांव : प्रतिनिधी
जीवनांकुर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्यावतीने मागील काही वर्षापासून मिशन हरित वसुंधरा चळवळीतंर्गत जिथे पाणी तेथे वृक्ष लागवड करुन त्यांचे संगोपन करण्यात येते. दि.१२ फेब्रु रोजी जीवनांकुरच्या माध्यमातून व लोक सहभागातून मौजे कार्ला (म) येथे जि.प.शाळेच्या परिसरात वृक्षांची लागवड करण्यात आली.
या नैसर्गिक कार्यात वंदना आमले सरपंच, मुरलीधर पवार उपसरपंच, रामराव बेळगर अध्यक्ष शा.व्य.समिती, दत्ता भिसे उपाध्यक्ष शा.व्य.समिती, वैजनाथ देशमुखे मुख्याध्यापक, हरिश्चंद्र चिल्लोरे जीवनांकुर संस्थापक, बालाजी हाके ग्रामसेवक, समाधान सोळंके, गोपाळ महाळनुरे, दिपक डवरे, माधव धुमाळे, संजय पाईकराव, बाबुराव कपाटे यांनी सहकार्य केले़ यावेळी वृक्षारोपनाच्या कार्यक्रमास शाळेच्या विद्यार्थ्यांसह कार्ला (म) व गारगोटी येथील जेष्ठ व प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित होते.