19 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeनांदेडस्व.डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या जन्म शताब्दीनिमित्त वृक्षारोपन

स्व.डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या जन्म शताब्दीनिमित्त वृक्षारोपन

एकमत ऑनलाईन

नांदेड : शहरात नांदेड वा. श.मनपा व वृक्षमित्र फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हरित नांदेड अभियान राबविले जात असून यामध्ये नांदेड नगरवासीयांचा मोठा सहभाग मिळत आहे. लोकसहभागातून अनेक कॉलनी हरित होत आहेत.
लॉक डाऊन च्या काळात एच.आय.जी.व लगतच्याच डी. आर.टी कॉलनीधारकांनी वृक्षलागवडी चा संकल्प केला.प्रत्येक मालमत्ता धारकांना ट्री गार्ड देण्याचे आवाहन करण्यात आले स्थानिक रहिवाशांनी ७६ ट्री गार्ड उपलब्ध करून दिले.वृक्षमित्र फाऊंडेशन ने महानगरपालिकेला सोबत घेऊन खड्डे खोदणे व वृक्षलागवडी चे नियोजन केले.

आज दि.३ ऑगस्ट सकाळी १०वाजता स्व.डॉ .शंकरराव चव्हाण साहेब यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने व नारळी पोणीर्मा व रंक्षाबंधन या सणाच्या निमित्य साधून मान्यवरांनी व एच.आय.जी. व डी.आर.टी. कॉलनीतील नागरिकांनी ७५ वृक्षांची ट्री-गार्ड सह लागवड केली.

आजच्या या कार्यक्रमासाठी मा.मा.खा.विठ्ठलराव जाधव मा.राज्यमंत्री श्री डी.पी.सावंत, आमदार श्री बालाजी कल्याणकर, महापौर सौ .दिक्षा धबाले, आयुक्त श्री.डॉ.सुनिल लहाने,उपायुक्त श्री शुभम क्यातमवार, उद्यान अधिक्षक डॉ फरहत बेग, सहायक आयुक्त राजेश चव्हाण, नगरसेवक विजय येवनकर, नागनाथ गड्डम, श्रीनिवास जाधव, राजू यन्नम तसेच गणेश श्रीमनवार, शेखर गावंडे व कॉलनीतिल नागरिक ,मनोहर बिडवई ,अनिल डहाळे, राजरत्न गायकवाड, माधव पांचाळ, म.रियाझ, रितेश व्यवहारे,डॉ जयंत जोशी, राजू करवा, पेंडलवार, हरीश पाटील, प्रा.मिलिंद भालेराव, पप्पू रूपानी, तसेच
वृक्षमित्र फाऊंडेशनचे संतोष मुगटकर, अतुल डोंगरगावकर, कैलास अमिलकंठवार, प्रशांत रत्नपारखी, घोरबांड सर, नरेश यन्नावार व आदिच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.

आजच्या कार्यक्रमात बकुळ, कदंब, लॅजरस्ट्रॉमीया, स्पथोडीया, कोनो कार्पेस,पर्यावरण पूरक व फुलझाडांची लागवड करण्यात आली. हरीत नांदेड अभियानांतर्गत पर्यावरण संवर्धनासाठी व शहराच्या वाढत्या तापमानास नियंत्रित ठेवण्यासाठी या पावसाळ्यात प्रत्येक नागरिकाने आपल्याला जमेल त्या जागेवर कमीत कमी एक झाड लावून त्याचे संगोपन करावे तसेच कॉलनीत वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

Read More  सोलापूर शहरात ४२ रुग्णांची भर, दोघांचा मृत्यू

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या