24 C
Latur
Tuesday, October 19, 2021
Homeनांदेडवृक्षारोपण हा कार्यक्रम प्रत्येक जवानाचा झाला पाहिजे

वृक्षारोपण हा कार्यक्रम प्रत्येक जवानाचा झाला पाहिजे

एकमत ऑनलाईन

नांदेड : हवामानात होणारे अनियमित बदल आणि प्रदुषण यावर वृक्षारोपण हा महत्वाचा उपाय आहे आणि त्यासाठी वृक्षारोपण कार्यक्रम राबविलाच पाहिजे. परंतु हा कार्यक्रम केवळ सरकारचा न राहता केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या प्रत्येक जवानाचा कार्यक्रम झाला पाहिजे अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज मुदखेड येथे वृक्षारोपणाचे महत्व विषद केले.

केंद्रीय सुरक्षा दलाच्या सात संस्थांनी वर्षभर राबविलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमातील एक कोटी वृक्षांचे रोपण अमित शहा यांच्या हस्ते मुदखेड येथील केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या प्रांगणात करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास नांदेडचे खा. प्रताप पाटील चिखलीकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या व्यासपीठावर केंद्रीय राखीव पोलिस दलाचे महानिरर्देशक कुलदिपसिंह आणि विशेष महानिरीक्षक राकेश यादव हेही उपस्थित होते.

अमित शहा पुढे म्हणाले की, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस यांचे औचित्य साधून वृक्षारोपणाचा हा कार्यक्रम आयोजित केला आहे. केंद्रीय पोलिस दलाने १ कोटी वृक्ष लावण्याचा संकल्प मागच्यावर्षी केला होता. या कार्यक्रमात लिंब, तुळशी आणि पिंपळ अशा वृक्षांची लागवड प्रामुख्याने करावी अशी सूचना आपण केली होती असे सांगून ते म्हणाले की, पिंपळाच्या वृक्षाचे रोपण करण्याची संधी मला मिळाली. याबद्दल मला आनंद वाटतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी बद्दल बोलतांना ते म्हणाले की, हवामानत होणारे अनियमित बदल आणि प्रदुषण यांचे गांभीर्य सर्वप्रथम नरेंद्र मोदी यांनीच जाणले आणि ते गुजरातचे मुख्यमंत्री असतांना त्यांनी यासंदर्भात स्वतंत्र खाते निर्माण करुन लक्षणिय काम केले.

मराठवाडा मुक्ती संग्रामात आहुती दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांना अमित शहा यांनी अभिवादन केले आणि स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्राफ आदी स्वातंत्र्य सैनिकांचा गौरवाने उल्लेख केला. आपल्या प्रास्ताविकात कुलदिपसिंह यांनी वृक्षारोपण कार्यक्रमाचा आढावा घेतला आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या मुदखेड शाखेस २0 हजार वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते ते आमच्या जवानांनी प्रयत्नपुर्वक पारपाडले असेही कुलदिपसिंह यांनी सांगितले. यावेळी कार्यक्रमास जुल्फिकार हसन, श्रीमती रशमी शुक्ला, एम.एस. भाटिया, राकेशकुमार यादव, एम.जे. विजय, प्रितमोहनसिंह, महेशकुमार, वि. शिव रामकृष्णा आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या