31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeनांदेडभीती दाखवून आदीवासी युवतीवर अत्याचार

भीती दाखवून आदीवासी युवतीवर अत्याचार

एकमत ऑनलाईन

माहूर, वाईबाजार : माहूर तालुक्यातील साकुर येथील बी.ए.च्या द्वितीय वर्षात शिक्षण घेणा-या १९ वर्षीय युवतीला प्रेम संबधातून एकत्र काढलेले फोटो भावी नवऱ्याला दाखविण्याची धमकी देवून जबरदस्ती करणाऱ्या आणि तसे फोटो भावी नवऱ्या पर्यंत पोहचून लग्न मोडण्यास कारणीभूत ठरलेल्या प्रदीप अवधूत तांबारे या २२ वर्षीय तरुणावर युवतींने दिलेल्या जबानीनुसार माहूर पोलिसांनी दि.२३ एप्रील रोजी गुन्हा दाखल करून अटक केली असून माहूर न्यायालयाने त्याला दोन दिवसाची रविवार पर्यंत पोलीस कोठडी दिली

माहूर पोलीस स्टेशन मध्ये उपस्थित होऊन दिलेल्या जबानीत अत्याचारीत युवतीने मी बी.ए.द्वितीय वर्षात शिक्षण घेत असून शिक्षणा निमित्त किनवटला ये- जा करीत असल्याने घरा शेजारी राहणा-या प्रदीपशी माझे दोन वषार्पूर्वी प्रेमसंबध जुळल्याने अधून मधून आम्ही एकमेकांना भेटत होतो. त्यावेळी त्याने आपल्या भ्रमणध्वनीवर एकत्र असलेले फोटो काढलेत.एक महीन्यापूर्वी गावा शेजारील युवकाशी माझा संबंध जुळला,तेंव्हा पासून प्रदीप माज्याशी विचित्र वागू लागला,संबंध ठेवले नाही तर प्रेम संबध व एकत्र काढलेले फोटो भावी नवर.्याला दाखविण्याची धमकी देवू लागल्याचा उल्लेख केला आहे.

मी दि.२३ मार्च रोजी परीक्षा देवून गावी निघाली होती.तेंव्हा प्रदीप माज्या जवळ आला,माज्या सोबत दुचाकीवर चल असा हट्ट करू लागल्याने मी त्याच्या सोबत गावी निघाली,दरम्यान दिडच्या सुमारास खरबी गावाजवळील पुलावर त्याने दुचाकी थांबवून परत तिच धमकी दिली, माझा हात धरला आणि पुलाखाली नेवून माज्यावर अत्याचार करून सदर बाबीची कुठेही वाच्यता केल्यास फोटो सर्वांना दाखविण्याची धमकी दिल्याची बाब तिने आपल्या जबानीत नमूद केली आहे.दि.४ एप्रिल रोजी माज्या भावी पतीने घरी येऊन पूर्वी तुझे कुणाशी लफडं होतं का ?अशी विचारणा केल्याने मी घाबरले व नाही म्हणून सांगितल्याची बाबही तिने आपल्या जबानीत नोंद केली आहे.

त्यानंतर दि.४ एप्रिल रोजी माज्या भावी पतीने आमचे ते फोटो माज्या वडिलांच्या भ्रमणध्वनीवर टाकून लग्न मोडीत असल्याचा निर्णय कळविला. सदर घटनेस प्रदीप तांबारे पूर्णत: कारणीभूत असल्याने त्याचेवर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्याची विनंती तिने आपल्या जबानीतून केली आहे.सदर प्रकरणाचा तपास पो.नि.नामदेव रिठ्ठे हे जातीने करीत आहेत. आरोपीस अटक केली असून माहूर न्यायालयाने त्याला दोन दिवसाची रविवार पर्यंत पोलीस कोठडी दिली असल्याची माहिती पो.नि.नामदेव रिठ्ठे यांनी दिली.

तिहेरी उत्परिवर्तनाचा धोका

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या