23 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeनांदेडअर्धापूर-नांदेड महामार्गावर बस-टेम्पो-ऑटोचा तिहेरी अपघात

अर्धापूर-नांदेड महामार्गावर बस-टेम्पो-ऑटोचा तिहेरी अपघात

एकमत ऑनलाईन

अर्धापूर : अर्धापूर-नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील खडकूत पाटीजवळ एका राज्य परिवाहन महामंडळाच्या बस गाडीने मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोला जोराची धडक दिल्याने हा टेम्पो दुसऱ्या एका ॲटोवर जावून आदळला. या विचित्र अपघातात ऑटोमधील एक महिला जखमी झाली असून तिला उपचारार्थ नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा तिहेरी अपघात दि. ३ जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजताचे सुमारास घडला.

अर्धापूर – नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील भोकर फाटा ते खडकूत फाटा येथे राज्य परिवहन महामंडळाची बस क्रं. एम. एच. ०६ – एस. ८८१० ने टेम्पो क्रमांक एम एच. एच. २२ ए. ए. २६०७ ला जोराची धडक दिल्याने हा टेम्पो समोर असलेल्या ऑटो क्रमांक ए. एच. – २६ – बी. डी. ४४१७ वर आदळल्याने आटोमधील महिला सौ. रत्नमाला राधाकिशन पाटकर ( वय ५३ वर्षे ) रा. मस्तानपुरा नांदेड ही गंभीर जखमी झाली.

घटनेची माहीती मिळताच वसमत फाटा महामार्ग पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून जखमी महिलेला नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. येथील महामार्ग पोलीस कर्मचारी रमाकांत शिंदे, संभाजी मोरे, मदतनीस वसंत सिनगारे यांनी महामार्गावरील वाहतूक सुरळीत करून रस्ता मोकळा करुन दिला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या