34.4 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeनांदेडहळदीला आली सोन्याची झळाळी ;पंधरा हजाराचा मिळाला दर

हळदीला आली सोन्याची झळाळी ;पंधरा हजाराचा मिळाला दर

एकमत ऑनलाईन

नांदेड : गेल्या दिवसात हळदीला सोन्याची झळाळी मिळाली आहे. हळदीला विदेशात व देशांतर्गत मागणी वाढल्याने आता दरामध्ये तेजी आली आहे. प्रतिक्विंटल साडे चार ते पाच हजारावर आलेल्या दराने आठ ते अकरा हजारांपर्यंत मजल मारली आहे.तर सोमवारी हळदीने तब्बल पंधरा हजाराचा दर मिळवत आठ वर्षातील उच्चांक मोडला आहे.यामुळे शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गेल्या दोन चार वर्षात शेतक-यांना विविध नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागत आहे.यामुळे शेतीचे उत्पन्न घटले आहे.तर कोरोनाच्या संकटामुळे राज्यात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच किरकोळ व लघु व्यवसाय बुडाले आहेत.यात सर्वाधिक फटका हा शेती व्यवसायाला बसल्याने शेतकरी रसातळाला गेला आहे.लॉकडाऊनमध्ये शिथीलता मिळताच शेतक-यांनी ऊस,हळद,भुईमुग,कापुस,केळी या नगदी पिकांवर भर दिला आहे.

हळद हे पीक प्रामुख्याने सौंदर्य प्रसाधने आणि औषधी निर्मितीसाठी उपयुक्त असणारे नगदी पीक आहे. हळद हे ऊसाला पयार्यी पीक असून हळदीचे पीक ऊसापेक्षा कमी पाण्यावर येणारे पीक आहे. त्यामुळे शेतकरी हळदीची लागवड करत आहेत. मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्हयांमध्ये प्रामुख्याने हे पीक घेतले जात आहे. हळदीच्या लागवडीपासून काढणीपर्यंत साधारणपणे १० ते ११ महिन्याचा कालावधी या पिकासाठी लागतो. सामान्यपणे लागवड ते काढणीपर्यंतचा सरासरी एकरी खर्च ५० ते ६० हजारापर्यंत येतो. यावर्षी अति पाऊस झाल्यामुळे हळदीचे उत्पादन प्रचंड घटले असून उतारा कमी निघत आहे. एकरी साधारणपणे ३० क्विंटल असणारे उत्पन्न २० क्विंटलपर्यंत आले आहे. ज्या कोरोनामुळे शेतीला वाईट दिवस आले.

तोच कोरोना मात्र हळदीच्या बाबतीत मात्र सध्या सकारात्मक चित्र दाखवत आहे. पाश्चिमात्य देशात कोरोनाची परिस्थिती अजूनही म्हणावी तितकी आटोक्यात नाही. हळद हे रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारे पीक आहे. त्यामुळे विदेशातही मागणी वाढत आहे. निर्यातही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यावर्षी जास्त पाऊस झाल्यामुळे देशातील उत्पादनही घटणार आहे. त्यातच देशातीलही मागणी वाढली आहे. त्यामुळे येणा-या काळात मोठी मागणी राहणार असल्यामुळे हळदीचे दर टिकून राहतील अशी शक्यता व्यापा-यांनी व्यक्त केली आहे. लॉकडाऊनच्या काळात अडचणीत सापडलेल्या शेतक-यांना हळदीला सध्या सोन्याची झळाळी मिळत असल्याने दिसून येत आहे. सध्या प्रतिक्विंटल साडे चार ते पाच हजारावर आलेल्या दराने आठवडा भरात आठ ते अकरा हजारांपर्यंत मजल मारत आठ वर्षातील उच्चांक मोडला आहे.

तर मागील आठवडयात कृषी उत्पन्न बाजार समितीत भीमराव देशमुख यांच्या अडतीमध्ये हळदीचा लिलाव झाला असता पार्डी म. ता.अधार्पूर येथील शेतकरी बाजीराव देशमुख यांच्या हळदीला पंधरा हजार इतका दर मिळाला. गेल्या आठ वर्षातील बाजार समितीतील दर असल्याचे बोलले जात आहे.हळदीचा चांगला दर मिळत असल्याने विविध संकटाचा सामना करणा-या शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महाकाय टेक कंपन्या विरुद्ध सरकारे!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या